Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

‘Hera Pheri 3 ‘मधून बाहेर पडले Paresh Rawal; निर्मात्यांसोबत झालेल्या वादामुळे घेतला माघार !
Hera Pheri 3सिनेमा संदर्भात एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बहुप्रतीक्षित विनोदी चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीसोबत ज्येष्ठ अभिनेता परेश रावल दिसणार नसल्याची माहिती मिळाली आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी 2025 च्या सुरुवातीला या प्रोजेक्टची घोषणा केली होती आणि तेव्हापासूनच प्रेक्षकांनी या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहायला सुरुवात केली होती. मात्र आता बाबूराव गणपतराव आपटेचा प्रसिद्ध आणि हृदयात घर केलेली भूमिका साकारणारे परेश रावल याने ‘हेरा फेरी 3’ मधून अंग काढून घेतल्याचे वृत्त आहे. ‘बॉलीवूड हंगामा’च्या रिपोर्टनुसार, ‘हेरा फेरी 3’ चा मुहूर्त शॉट नुकताच पार पडला होता आणि त्यामुळे प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. पण त्याचवेळी हेही समजले की परेश रावल या चित्रपटातून बाहेर पडले आहेत. एका विश्वसनीय सूत्राने सांगितले की, निर्माते आणि परेश रावल यांच्यात कथानक व भूमिकांबाबत सर्जनशील मतभेद झाले, ज्यामुळे त्यांनी हा चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला.(Hera Pheri Paresh Rawal Exit)

परेश रावल यांनी स्वतः एका मुलाखतीमध्ये या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “हो, हे सत्य आहे.” काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘द लल्लनटॉप’ या माध्यमाशी बोलताना त्यांच्या ‘बाबूराव’च्याभूमिकेबद्दल मत व्यक्त केले होते. त्यांनी सांगितले की, बाबूरावची भूमिका आता त्यांच्या गळ्यातील फास झाली आहे. त्यांनी हेही कबूल केले की, केवळ प्रेक्षकांच्या अपेक्षांना व कथेला न्याय देण्यासाठी ते ‘हेरा फेरी’चा पुढील भाग करण्यास तयार होते, अन्यथा त्यांना यामध्ये फारशी मजा वाटत नव्हती.

याआधीच्या दोन्ही ‘हेरा फेरी’ चित्रपटांनी भारतीय प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले आहे. 2000 मध्ये आलेला ‘हेरा फेरी’ आणि 2006 चा ‘फिर हेरा फेरी’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर गडगडाट यश मिळवले होते. बाबूराव, श्याम आणि राजू या तिघांच्या भन्नाट विनोदांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. त्यामुळे, या त्रिकुटापैकी एकाची अनुपस्थिती प्रेक्षकांसाठी निराशाजनक ठरू शकते. (Hera Pheri Paresh Rawal Exit)
===============================
===============================
चित्रपट निर्माते प्रियदर्शन सध्या ‘हेरा फेरी 3’ च्या कथा आणि कास्टिंगवर पुन्हा विचार करत असल्याचेही काही अहवालात नमूद करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, चाहत्यांना वाट पाहावी लागणार आहे की खरंच बाबूराव पुन्हा आपल्या जुन्या अवतारात दिसेल का, की या वेळी ‘हेरा फेरी’ एका नव्या वळणावर जाईल.