Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Paresh Rawal यांचं पुन्हा एकदा मराठी नाटकांवरील प्रेम आलं समोर; प्रेक्षकांसोबत बसून पाहिलं ‘हे’ नाटक

 Paresh Rawal यांचं पुन्हा एकदा मराठी नाटकांवरील प्रेम आलं समोर; प्रेक्षकांसोबत बसून पाहिलं ‘हे’ नाटक
मिक्स मसाला

Paresh Rawal यांचं पुन्हा एकदा मराठी नाटकांवरील प्रेम आलं समोर; प्रेक्षकांसोबत बसून पाहिलं ‘हे’ नाटक

by रसिका शिंदे-पॉल 05/01/2026

मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीला अमराठी कलाकार आणि रसिक प्रेक्षकांनी कायमच प्रेम दिलं आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) पासून ते अगदी रजनीकांत (Rajinikanth) यांच्यापर्यंत मराठी नाटक, चित्रपटांचं कौतुक बऱ्याच कलाकारांनी आजवर केलं आहे. अशातच ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी पुन्हा एकदा मराठी नाटकाचं विशेष कौतुक करत नाटकाचा प्रयोगही आवर्जून पाहिला आहे. बरं, परेश रावल (Paresh Rawal) हे मराठी नाटकांचे चाहते आहेत आणि त्यांनी बऱ्याच मुलाखतींमधून त्याचा उल्लेख केला आहेच. काही महिन्यांपूर्वी त्यांनी प्राजक्त देशमुख लिखित ‘संगीत देवबाभळी’ नाटकाचं कौतुकही त्यांनी एका हिंदी मुलाखतीत आवर्जून केलं होतं. आता नुकतंच मुंबईतील दादर येथे मराठी नाटकांच्या फेस्टिवलला त्यांनी हजेरी लावत प्रेक्षकांमध्ये बसून त्यांनी मराठी नाटकाचा आनंद घेतला.

दादरमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे मराठी नाटकांचं फेस्टिवल आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी आनंद इंगळे यांच्या ‘पॉपकॉर्न’ (Popcorn) या मराठी नाटकाच्या प्रयोगाला परेश रावल यांनी हजेरी लावली होती. सर्वसामान्यांप्रमाणे ते नाटकाचा आनंद घेत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दिसतं की त्यांच्या बाजूला गीतकार स्वानंद किरकिरे, लेखक-दिग्दर्शक विजय केंकरे देखील बसले आहेत.  (Marathi Natak)

================================

हे देखील वाचा : परेश रावल… बहुरंगी, बहुआयामी, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व!!

================================

दरम्यान, ‘पॉपकॉर्न’ हे नाटक विवेक बेळे यांनी लिहिलं असून याचं दिग्दर्शनही केलं आहे. नाटकात आनंद इंगळेंसह अंबर गणपुले, गायत्री देशपांडे, गौरी देशपांडे, दिप्पी लेले हे कलाकार आहेत. ‘पॉपकॉर्न:फॅमिली मॅटर्स’ असं नाटकाचं नाव आहे. परेश नुकतेच ‘थामा’ चित्रपटात दिसले होते. तसेच, लवकरच ‘हेरा फेरी ३’ (Hema Pheri 3), ‘वेलकम टु द जंगल’ या कॉमेडी चित्रपटांत दिसणार आहेत. या आधी देखील हिंदीतील अनेक कलाकारांनी मराठी नाटकांचं विशेष कौतुक केलं आहे. अभिनेत्री तब्बू हिने ‘२ वाजून २२ मिनिटं’ या नाटकाचा प्रयोगाला हजेरी लावत कलाकारांच्या अभिनयाला दाद दिली होती.  (Entertainment News)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Amitabh Bachchan Anand ingale Bollywood Bollywood Chitchat bollywood update Marathi Natak paresh rawal Rajinikanth tabbu
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.