Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Paresh Rawal : ‘हेरा फेरी ३’ चित्रपट का सोडला? बाबू भैय्यांनी दिलं स्पष्टीकरण
‘हेरा फेरी’ (Hera Pheri) या कल्ट चित्रपटाचं करावं तितकं कौतुक आणि या चित्रपटाबद्दल बोलावं तितकं कमी आहे. चित्रपटातील प्रत्येक संवाद आज मीम्ससाठी पोषक ठरला आहे. दरम्यान, ‘हेरा फेरी’ १ आणि २ या दोन्ही भागांना मिळालेल्या तुफान यशानंतर लवकरच ‘हेरा फेरी ३’ येणार असं सांगण्यात आलं होतं. पुन्हा एकदा दिग्दर्शक प्रियदर्शन आपला विनोदी बाज प्रेक्षकांसमोर ‘हेरा फेरी ३’ (Hera Pheri 3) मधून मांडणार आहेत. पण या तिसऱ्या भागातून चक्क बाबू भैय्या अर्थात Paresh Rawal यांनीच एक्झिट घेतली आहे. नेमकं असं त्यांनी का केलं याचं स्पष्टीकरण त्यांनी एका सोशल मिडिया पोस्टमधून दिलं आहे. (Bollywood)

गेल्या काही दिवसांपासून परेश रावल (Paresh Rawal) त्यांच्या काही विधानांमुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच ते ‘हेरा फेरी ३’ चित्रपटाचा भाग नसणार असं समोर आलं होतं. चित्रपटाच्या मेकर्ससोबत परेश यांचा वैचारिक मतभेद असल्यामुळे त्यांनी चित्रपटात बाबू भैया ही भूमिका साकारण्यास नकार दिल्याचंही म्हटलं गेलं. मात्र, आता त्यावर परेश यांनी एख महत्वाचा खुलासा केला आहे.(Entertainment trending news)

परेश रावल (Paresh Rawal) यांनी सोशल मिडिया पोस्ट करत लिहिलं आहे की, “मला हे सांगायला आवडेल की, ‘हेरा फेरी ३’ मध्ये काम न करण्याच्या निर्णयामागे माझे चित्रपटाच्या निर्मात्यांसह वैचारिक मतभेद आहेत असं कुठलंही कारण नाही आहे. तर मला चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शनबद्दल खूप आदर आणि प्रेम आहे.” त्यामुळे मतं किंवा वैचारिक भेदांमुळे परेश यांनी चित्रपट नाकारला हे कारण सपशेल त्यांनी बाद केलं आहे. (Bollywood news)
================================
=================================
‘हेरा फेरी’ या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात परेश रावल, अक्षय कुमार, सुनील शेट्टी, तब्बू यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तसेच, तब्बल १० आठवडे या चित्रपटाने थिएटरमध्ये १२.३६ कोटींचा गल्ला जमवला होता. तर या चित्रपटाने १७.८ कोटी जगभरात कमावले होते. (Hera Pheri Box office collection)