‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’मध्ये दिसणार Subodh Bhave चा लव्ह ट्रायअॅंगल

Parinati Marathi Movie Trailer: दोन सशक्त स्त्रियांची हृदयस्पर्शी गोष्ट सांगणाऱ्या परिणती सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित!
काही दिवसांपूर्वी ‘परिणती – बदल स्वतःसाठी’ या चित्रपटाच्या पोस्टरनेच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्यातून उलगडणारी कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहे. मराठी सिनेमातल्या दोन जबरदस्त अभिनेत्री अमृता सुभाष आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी एका स्क्रीनवर एकत्र पाहण्याची उत्सुकता आता आणखी वाढली आहे.(Parinati Marathi Movie Trailer)

हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पार्श्वभूमी असलेल्या स्त्रियांची कहाणी सांगतो. त्यांच्या अचानक झालेल्या भेटीपासून सुरू झालेली एक खास मैत्री, संघर्षातून उभं राहण्याची प्रेरणा आणि स्वतःच्या अस्तित्वाचा शोध ही या कथेमागची मध्यवर्ती भावना आहे. ट्रेलरमध्ये अमृता सुभाष एका डॉक्टरच्या भूमिकेत दिसते. घर, नवरा, मुलगा असं एक परिपूर्ण आयुष्य ती जगत असताना, एक अनपेक्षित प्रसंग तिचं आयुष्य बदलून टाकतो. ती खचून जाते. याच वेळी तिच्या आयुष्यात येते सोनाली कुलकर्णी, जी एका बार डान्सरची भूमिका साकारते. तिचा दिलखुलास स्वभाव आणि समजून घेण्याची वृत्ती यामुळे दोघींमध्ये एक अनोखी मैत्री निर्माण होते.

दिग्दर्शक अक्षय बाळसराफ म्हणतात, “परिणती ही दोन स्त्रियांची कथा आहे. परंतु त्याहूनही जास्त ती आहे त्यांच्या स्वतःच्या ओळखीचा आणि आत्मभानाचा प्रवास. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी स्वतःवर विश्वास असेल तर आपण पुन्हा उभं राहू शकतो हे या चित्रपटाचं खरं सांगणं आहे.” ‘परिणती – बदल स्वतःसाठी’ हा चित्रपट १ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.(Parinati Marathi Movie Trailer)
==============================
हे देखील वाचा: Kurla To Vengurla Marathi Movie: लग्न व्यवस्थेतील गुंतागुंतीचा वेध घेणारी हलकीफुलकी गोष्ट आता मोठ्या पडद्यावर !
==============================
अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी आणि अक्षर कोठारी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अक्षय बाळसराफ यांनी केलं आहे. चित्रपटाची निर्मिती PH Films, Phoenix Films आणि InSync Motion Pictures यांनी केली असून, पराग मेहता आणि हर्ष नरूला हे प्रमुख निर्माते आहेत. सहनिर्मितीमध्ये अमित डोगरा, मोना नरूला, आशिष त्रिवेदी, शारदा नरूला, मनोज जैन, मोहित लालवानी, कांचन शाह आणि शांता जैन यांचा सहभाग आहे. भावना, मैत्री आणि आत्मभान यांचा सुंदर मिलाफ असलेला ‘परिणती’ हा चित्रपट एक भावनिक अनुभव देणारा ठरेल, याची झलक ट्रेलर पाहूनच स्पष्ट होते.