परीवॉर : संपत्ती, मालमत्ता, नाती आणि बरच काही…
पर्व : पहिले
ऑनलाईन प्लॅटफॉर्म : हॉटस्टार
कलाकार : गजराज राव, विजय राज, यशपाल शर्मा, रणवीर शोरी, संध्या सिद्दीकी, अनुरिता झा, निधी सिंग, अभिषेक बॅनर्जी आणि इतर
सारांश : कौटुंबिक वादाला मालमत्तेच्या वाटणीची फोडणी मिळाल्यावर हा वाद अनेक अनपेक्षित वळण घेत जातो.
——
एका छोट्या गावामध्ये राहणारा आपल्या मुलांच्या आठवणींमध्ये हरवून गेलेल्या एकट्या बापाचे त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसणे, कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांना घरी बोलवायची निमित्ते शोधणे आणि मुलांनी तितक्याच शुष्कपणे बापाच्या या आरोळीकडे दुर्लक्ष करणे हे चक्र काशी नारायणला चुकलेलं नसतं. बायकोच्या जाण्यानंतर तो आणि नोकर असे दोघेत पिढीजात हवेलीमध्ये दिवस काढत असतात. पण हा बाप नव्या काळातील आहे. तो मुलांना पत्रे लिहत नाही, तर त्यांच्या समाज माध्यमांवर त्यांच्यासाठी मेसेज लिहतो, त्यांच्या फोटोखाली कमेंट करतो. मुलं आपला नंबर ब्लोक करत आहेत, हे लक्षात आल्यावर सतत आपले नंबर बदलून त्यांना फोन करत असतो.
शेवटी त्याला एक युक्ती सुचते. एकेदिवशी छोट्याशा कारणाने हॉस्पिटलची आयती वारी करावी लागल्याच्या सुवर्णसंधीचा फायदा तो घेतो. आपण मृत्युच्या दरवाजात उभे असून मुलांना शेवटचं भेटायचं आहे, अशी बतावणी नोक्रक्र्वी करतो. सहाजिकच तिघेही हवेलीमध्ये हजर होतात. पण तिथे गेल्यावर त्यांना लक्षात येतं, इथे वेगळच चित्र निर्माण झालं आहे.
विधुरपणाच्या एकटेपणाचा अनुभव गाठीशी असल्यामुळे काशी आपल्या नावावरील पिढीजात जमीनवर विधुराश्रम बांधण्याचा घाट बांधत असतो. नाटककंपनीचा मालक असलेला गंगाराम त्याच्या मित्राच्या नात्याने या सगळ्यात काशीला मदत असतो. पण हे सगळं करण्यासाठी त्यांना काशीच्या तिन्ही मुलांच्या सह्या णा हरकत प्रमाणपत्रावर हव्या असतात. बरं काशीची तीन मुले बडके म्हणजे शिशुपाल, छोटके म्हणजे महीपाल आणि मंजू यांची आयुष्ये एका वेगळ्याच वळणावर जात असतात.
हेही वाचा : मुखवटाधारी शोषितांचं जगणं मांडणारे तीन चेहरे…
मुंबईमध्ये तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या बडकेला पैशांची गरज असतेच. बनारसमध्ये राहणाऱ्या छोटके कर्जबाजरी झालेला असतो, त्यामुळे त्यालाही जमिनीच्या व्यवहारातून येणारे पैसे खुलवत असतात. अमेरिकेत शेफ म्हणू काम करणारी मंजूसुद्धा तिथल्या नोकरीला कंटाळलेली असते, पण तिला पैशांपेक्षा वडिलांची इच्छा जास्त महत्त्वाची असते. त्यामुळे विधुराश्रम बनविण्यापेक्षा सिमेंट कारखाना बनवायला जमीन दिल्यास त्यातून होणारा करोडो रुपयांचा फायदा त्यांना खुणावत असतो. अर्थात ही बाब काशीला मात्र मान्य नसते. त्यात ज्यावर काशी आंधळेपणाने विश्वास करतो आहे, तो गंगारामचं त्याला फसवून सिमेंट कारखान्यासाठी जमीन विकून पैसे गिळंकुत करण्याचं डाव रचत असल्याचं तिघांना लक्षात येत. पण काशी मात्र त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला तयार नसतो.
या सगळ्यात जमिनीवर नक्की काय बांधलं जाणार? गंगाराम नारायण कुटुंबाला लुटणार की त्याचं पितळ उघड पडणार? या प्रश्नांची उत्तरं शोधायला सिरीज पहायला लागेल.
लेखाच्या सुरवातीला स्टार कास्टमधील नावं वाचली असतील, तर तुम्हाला लक्षात आलं असेलच की या सिरीजचा सगळ्याच महत्त्वाचा दुवा हाच आहे. चित्रपट, वेबसिरीज विश्वातील मातब्बर मंडळी एकाच छताखाली पहायला मिळणार असतील, तर अपेक्षा वाढणं सहाजिकच आहे. त्यामुळे प्रोमोपासून सिरीज प्रेक्षकांची उत्सुकता वाढवते. त्यात दिग्दर्शकाच्या पाटीवर सागर बल्लारे नावं वाचल्यावर ही अपेक्षा अजूनच वाढते. त्याचा भेजा फ्राय सिनेमा ज्यांनी पाहिला आहे त्यांना सागरच्या मार्मिक विनोदी शैलीतील कथानक हाताळण्याच्या कौशल्याबाबत काही न सांगणेच उत्तम.
हे तर वाचलेच पाहिजे : नेटफ्लिक्स आणि पहिली भारतीय कलाकृती
या सिरीजची वाटसुद्धा याचं दिशेने जाते. सुरवातीच्या भागांमध्ये पात्रांची ओळख, त्यांची पार्श्वभूमी आणि सिरीजच कथानक बांधताना दिग्दर्शकाची कथानकावरची पकड लक्षात येते. पण नंतर अचानकपणे गोष्ट हेलकावे खाऊ लागते. काही ठिकाणी विनोद अपेक्षित असतानासुद्धा पसंग अगदीच मुळमुळीत सोडल्यामुळे प्रेक्षकांची निराशा होते. पण त्याचवेळी कथेतील वेगळंपण बऱ्याच प्रमाणामध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवतं.
एकीकडे सिरीजचे प्रत्येक भाग ४५ मिनिटे ते एक तास लांबीपर्यंत खेचण्याची शर्यत इतरत्र सुरु असताना या सिरीजमध्ये मात्र दिग्दर्शक अर्जुन मर्यादित २०-३० मिनिटाची वेळ निवडतो.
त्यातून त्याची कथेवरची पकड आणि विश्वास दिसून येतो. त्यामुळे कुठेही सिरीज कंटाळवाणी होत नाही. बर एकटा राहणारा बाप, त्याच्याशी उद्धट बोलणारे मुलगे, वडिलांच्या जवळ असलेली मुलगी असं भावनिक मालमसाला उपलब्ध असूनही सिरीजला इमोशनल ड्रामाचा रंग देण्याचा मोह दिग्दर्शकाने आवरता गेटला आहे.
आपले मुलगे निगरगट्ट आहेत याची जाणीव असल्यामुळे गजराज रावने रंगविलेला काशीसुद्धा तितकाच बेफिकीर आपल्या दुनियेमध्ये मश्गुल रंगविलेला आहे. सिरीजच्या शेवटचा ड्रामा थोडा अजून रंगला असता, तर कदाचित सिरीजची लज्जत अजूनच वाढली असती. पण कौटुंबिक वादाची ही मार्मिक फोडणी आपल्याला खिळवते.