Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Phula Movie Poster: लोकपरंपरेच्या सावलीत उमलणारी एका मुलीची वेदनादायी कहाणी

Amitabh Bachchan : ‘कभी कभी’ चित्रपटाची ५० वर्ष पूर्ण!

Rashmika & Vijay : ‘विरोश’च्या हळदीचे खास फोटो आले समोर;

The Kerala Story 2 ला सेन्सॉर बोर्डाची कात्री; तब्बल १६

Bigg Boss Marathi 6: ‘आम्ही रीलस्टार नाही रियल स्टार’, Bigg

‘बागबान‘ सिनेमाकरीता बी आर चोप्रा यांना Dilip Kumar हवा होता!

Abhinay Berde, हार्दिक जोशी अभिनेत्री प्रितम कागणे, दीप्ती देवी यांचा

Rohit Raut म्हणतोय ‘डीपी झूम करून’

Big Boss Marathi 6 : टोळी आणि बाल्कनी ग्रुपने केलं

Super Duper Movie Poster ने वाढवली उत्सुकता; उन्हाळ्यात अनुभवता येणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Phula Movie Poster: लोकपरंपरेच्या सावलीत उमलणारी एका मुलीची वेदनादायी कहाणी ‘फुला’!

मिक्स मसाला

Phula Movie Poster: लोकपरंपरेच्या सावलीत उमलणारी एका मुलीची वेदनादायी कहाणी ‘फुला’!

by Team KalakrutiMedia 26/02/2026

अस्सल मराठी संस्कृतीच्या पायाभूत परंपरांमध्ये खोलवर रुजलेली वाघ्या-मुरळी प्रथा आणि त्यातून घडणारे आयुष्याचे चटके मोठ्या पडद्यावर आणण्याचे धाडस ‘फुला’(Phula) या आगामी मराठी चित्रपटाने केले आहे. जेजुरीतील खंडेरायाच्या साक्षीने चित्रपटाचे पोस्टर अनावरण करण्यात आले आणि याच वेळी या कथानकाच्या सामाजिक आशयाची झलक रसिकांना मिळाली. १७ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा हा चित्रपट ग्रामीण वास्तव आणि लोककलेच्या जगात डोकावण्याची संधी देणार आहे. ‘फुला’ ही एका मुरळीच्या पोटी जन्मलेल्या निरागस मुलीची कहाणी आहे. तमाशा फड, जागरण-गोंधळ आणि लोककलेच्या पारंपरिक रंगमंचावर वाढणाऱ्या तिच्या आयुष्याला समाजाच्या चौकटींचा वेढा असतो. कलेचा गौरव केला जातो; पण कलाकार स्त्रीच्या आयुष्याकडे मात्र उपेक्षेने पाहिले जाते याच विसंगतीवर चित्रपट भाष्य करतो.(Phula Marathi Movie Poster)

Phula Marathi Movie
Phula Marathi Movie 2026

दिग्दर्शक अभिषेक जावीर यांनी या कथेबद्दल बोलताना सांगितले की, हा चित्रपट केवळ एका व्यक्तीची शोकांतिका नाही; तर पारंपरिक लोककलांमध्ये गुंतलेल्या स्त्रियांच्या जगण्याचा आरसा आहे. त्यांच्या स्वप्नांना, हक्कांना आणि सन्मानाला समाज किती वेळा नाकारतो, याचे वास्तव चित्रण यातून पाहायला मिळेल.या चित्रपटाची निर्मिती पै. अजित शिवाजी जाधव यांनी केली असून शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा यांनी प्रस्तुतीची धुरा सांभाळली आहे. पटकथा रवीकिरण जावीर यांची असून संगीताची जबाबदारी समाधान ऐवळे यांनी सांभाळली आहे. ग्रामीण मातीत वाढलेल्या टीमनेच हा चित्रपट साकारला आहे, ही त्याची खास जमेची बाजू.

Phula Marathi Movie
Phula Marathi Movie 2026

छायांकन प्रताप जोशी, कला दिग्दर्शन अतुल लोखंडे, संकलन राहुल प्रजापती यांनी केले आहे. वेशभूषा कोमल जावीर आणि अक्षता पाटील यांनी साकारली असून रंगभूषा समाधान भोरे यांची आहे. गायनात वैशाली सामंत, वैशाली माडे, रोहित राऊत यांसारख्या गायकांनी स्वर दिले आहेत. चित्रपटात प्रियांतिका, आरोही गडदे, मंजुषा खेत्री, संतोष शिंदे, देवा गाडेकर यांसह नवोदित कलाकारांची फळी आहे. विशेष म्हणजे, सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावातील कलाकार व तंत्रज्ञांनी एकत्र येऊन हा पहिलाच चित्रपट उभा केला आहे.(Phula Marathi Movie Poster)

===============================

हे देखील वाचा: The Kerala Story 2 ला सेन्सॉर बोर्डाची कात्री; तब्बल १६ सीन्समध्ये केले मोठे बदल…

===============================

‘फुला’ हा केवळ मनोरंजनाचा भाग नाही; तो एका सामाजिक वास्तवाकडे बोट दाखवतो. परंपरेच्या नावाखाली चालत आलेल्या रूढी आणि त्यातून होणारे स्त्रियांचे शोषण यावर तो थेट प्रश्न उपस्थित करतो. लोककलेचा वारसा जपत असताना कलाकाराच्या मानवी हक्कांचा विचार करणे किती गरजेचे आहे, हे या चित्रपटातून प्रकर्षाने जाणवते. १७ एप्रिलला प्रदर्शित होणारा ‘फुला’ प्रेक्षकांना केवळ कथा सांगणार नाही, तर विचार करायला भाग पाडणार आहे. महाराष्ट्राच्या मातीतून उमललेली ही कथा अनेकांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळेल, यात शंका नाही.  

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Abhishek Javir Film Ajit Shivaji Jadhav Celebrity Entertainment Jejuri Poster Launch Marathi Folk Culture Marathi Movie marathi movie 2026 Marathi Social Drama marathi upcoming film Phula April 17 Release Phula Marathi Film Phula Movie Phula Movie Poster Ravikiran Javir Rural Marathi Cinema Tamasha Based Movie Waghya Murali Tradition
Previous post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.