
Salman Khan & Aishwerya Rai : ….जेव्हा सलमान ऐश्वर्याच्या घरी जाऊन भिंतीवर डोकं आपटायचा!
बॉलिवूडमध्ये बऱ्याच कलाकारांची अफेअर्स गाजली… परंतु, ऐश्वर्या राय (Aishwerya Rai) आणि सलमान खान (Salman Khan) यांच्या अफेरच्या चर्चांपुढे कसाच तोड नाही… आजही दोघं आपापल्या आयुष्यात जरी सुखी असले तरी प्रेक्षकांना ऐश्वर्या आणि सलमान यांनी एकत्र यायला हवं होतं असं नक्कीच वाटतं… संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ (१९९९) चित्रपटाच्या सेटवर दोघांची जवळीकचा वाढू लागली… कालांतराने त्यांचं नातं संपलं ते कायमचं.. मात्र, या सगळ्यात ऐश्वर्या रायची संपूर्ण इंडस्ट्रीने साथ सोडली होती असा खुलासा एका दिग्दर्शकाने केला आहे… नेमकं ते काय म्हणाले जाणून घेऊयात…(Bollywood couple affairs)

तर, दिग्दर्शक प्रल्दाद कक्कर यांनी एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्या नात्याबद्दल खुलासा केला… प्रल्हाद ऐश्वर्या राय हिची आई ज्या बिल्डिंगमध्ये राहायची तिथेच ते देखील राहात होते… त्यामुळे सलमान आणि ऐश्वर्याच्या ब्रेकअपनंतर सलमान तिच्या घरी येऊन जे तमाशे घालायचा ते सारं काही त्यांना माहित होतं… मुलाखतीत प्रल्हाद कक्कर म्हणाले की, “ऐश्वर्याला बॉलिवूडने मध्येच सोडून दिलं, त्यामुळे तिला खूप वाईट वाटलं होतं आणि फसवल्याचा अनुभव आला होता”…(Salman khan news)

पुढे प्रल्हाद कक्कर म्हणाले की, “त्या नात्यामुळे ऐश्वर्याच्या करिअरवर खूप वाईट परिणाम झाला होता. मी तिला फक्त सपोर्ट करत होतो. मी तिला सांगितलं होतं की काळजी करू नकोस. पण तिचं म्हणणं होतं की, इंडस्ट्रीचं काय? इंडस्ट्रीने सलमानसाठी मला मध्येच सोडून दिलं, या गोष्टीमुळे ऐश्वर्याला सर्वात जास्त वाईट वाटलं. तिला विश्वासघात झाल्यासारखं वाटलं होतं...”(Aishwerya rai affair with salman khan)

प्रल्हाद कक्कर पुढे म्हणाले की, “ऐश्वर्याला ब्रेकअपचं फारसं वाईट वाटलं नाही, जितकं इंडस्ट्रीने तिला दुर्लक्षित केल्यामुळे वाटलं. माझ्या मते, ती ब्रेकअपमुळे दु:खी नव्हती, तर तिला या गोष्टीचं दु:ख होतं की सगळे सलमानची बाजू घेत होते. तिच्या बाजूने कोणीच नव्हतं, जरी सत्य तिच्या बाजूने होतं तरी. इंडस्ट्री तटस्थ नसल्यामुळे तिचा त्यांच्यावरचा विश्वास उडून गेला होता.”
================================
हे देखील वाचा : शाहरुख नाही तर सलमान खानच होता खरा Devdas; ब्रेकअपनंतरही चित्रित झालेला ‘तो’ सीन
=================================
सलमान आणि ऐश्वर्या यांच्यात केवळ शाब्दिक भांडण नाही तर सलमानने हात उचलण्यापर्यंत प्रकरण गेलं होतं हे सगळ्यांना माहित आहेच… सलमानच्या राग आणि संशयामुळे त्यांच्या नात्यात कटुता आली होती.. प्रल्हाद यांनी असं देखील सांगितलं की, सलमान खान ऐश्वर्याच्या घरी येऊन खुप भांडण करायचा… इतकंच नाही तर रागात स्वत:चं डोकं भिंतीवर आपटायचा… त्यांच्यातील नातं खरं तर फार आधीच संपलं होतं, पण लोकांसमोर ते जरा उशीरा आलं”… एकूणच काय तर सलमान आणि ऐश्वर्या हा कधीही न संपणारा विषय आहे हे मात्र तितकंच खरं आहे…(Entertainment News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi