Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘मला माहीत नाही मी परत येईल की नाही…’ Neha Kakkar

Punha Ekda Saade Maade 3 Trailer : कुरळे बंधू परतले…

Shiv Thakare ‘या’ वर्षी करणार लग्न; स्वत:चं दिली वेडिंग अपडेट

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात येणार मोठा ट्विस्ट;

रणजीत गजमेर यांचे मादल वाद्य आणि त्यावरची R.D.Burmanची बेहतरीन गाणी!

Big Boss Marathi Season 6 च्या घरातील चावी चोराचा रितेश

Rajkumar Rao-Patralekha यांनी लेकीचं ठेवलंय ‘हे’ नाव, हिंदू संस्कृतीशी नावाचं

“Dilip Kumar यांनी पाकिस्तानातच राहाला जावं”; बाळासाहेब असं का म्हणाले

Maya Marathi Movie: नात्यांची निःशब्द कहाणी सांगणाऱ्या सिनेमाचे मोशन पोस्टर

SHATAK : RSS शताब्दीच्या निमित्ताने ‘शतक’ चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत प्रदर्शित!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

प्राजक्ता आणि विरुची अनोखी प्रेमकथा ‘तुजं माजं सपान’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला… 

 प्राजक्ता आणि विरुची अनोखी प्रेमकथा ‘तुजं माजं सपान’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला… 
kalakruti-prajakta-and-virus-unique-love-story-tuja-maja-sapan- is-all-set-to-hit-the-screens-soon-marathi-info/
टीव्ही वाले मिक्स मसाला

प्राजक्ता आणि विरुची अनोखी प्रेमकथा ‘तुजं माजं सपान’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला… 

by शुभांगी साळवे 14/06/2023

सोनी मराठी वाहिनी कायमच निरनिराळे विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. ‘तुजं माजं सपान’ ही दैनंदिन मालिका  प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. त्याची झलक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडते आहे.  नुकताच मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यामध्ये दोघेही आपल्याला कुस्ती करताना दिसताहेत.प्राजक्ता आणि वीरू यांच्या प्रेमाची निराळी गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. मालिकेत प्राजक्ता आणि वीरेंद्र यांच्या प्रेमाचे तुफान कसे येणार, हे पाहायला मिळेल. मालिकेत दोघेही कुस्तीपटू दाखवले आहेत आणि एखाद्या मालिकेत कुस्तीपटूंची जोडी प्रेक्षकांना पहिल्यांदाच  पाहायला मिळणार आहे. कुस्ती या दोघांना कशा प्रकारे एकत्र आणेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. वीरूच्या डोळ्यांतले त्याचे स्वप्न प्राजक्ता पूर्ण करेल काआणि त्यांचा हा प्रवास प्रेक्षकांना कशा प्रकारे पाहायला मिळेल, हे आपल्याला मालिकेत दिसणार आहे. मालिका १९ जूनपासून  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.(Tuja Maja Sapan)

Tuja Maja Sapan
Tuja Maja Sapan

मालिकेची मूळ कहाणी ही कोल्हापूरची आहे. प्राजक्ताची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री ही मुळातच कुस्तीपटू आहे. साताऱ्याला राहणारी ही अभिनेत्री गेली अनेक वर्षे कुस्तीचा सराव करते आहे. तिचे नाव प्राजक्ता चव्हाण आहे. आजवर तिने  कुस्तीच्या विश्वात चांगले नाव कमविले आहे. तिने आत्तापर्यंत राष्ट्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर कुस्तीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आता मालिकेतील व्यक्तिरेखेबरोबरच कुस्ती जोपासणारी प्राजक्ता पाहायला मिळणार आहे. वीरूच्या भूमिकेत  आपल्याला संकेत चिकटगावकर हा गुणी अभिनेता पाहायला मिळणार आहे. संकेत हा मूळच्या औरंगाबादजवळील वैजापूर  इथला आहे. हे दोन्ही नवे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येताहेत. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या वेटक्लाऊड या निर्मिती संस्थेने ह्या मालिकेची निर्मिती केली जात आहे. 

Tuja Maja Sapan
Tuja Maja Sapan

सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांची ही पहिली दैनंदिन मालिका असणार आहे.’तुजं माजं सपान’ या मालिकेचं चित्रीकरण नाशिक येथे करण्यात येते आहे.सोनी मराठी वाहिनी नेहमी आशयघन विषय घेऊन येते ‘तुजं माजं सपान’ या मालिकेतून एक  वेगळा विषय प्रेक्षकांसमोर मांडला आहे. (Tuja Maja Sapan)

================================ 

हे देखील वाचा: तूफान मनोरंजन करणारे बालनाट्य “मंकी इन द हाऊस” लवकरच रंगभूमीवर 

================================

या नव्या जोडीचे सामायिक ध्येय आणि स्वप्न काय असेल आणि त्यांची स्वप्नपूर्ती कशा प्रकारे  होईल, हे या मालिकेतून आपल्याला पाहायला मिळेल. वीरू आणि प्राजक्ता यांच्या या अनोख्या कहाणीची सुरुवात कशा प्रकारे होते आहे, हे आपल्याला १९ जूनपासून पाहता येणार आहे, 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment Marathi Serial Sony marathi Tuja Maja Sapan Tuja Maja Sapan marathi serial
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.