Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Prajakta Gaikwad हिचा शंभुराजसोबत दादा ते अहोंपर्यंतचा प्रवास कसा होता?
‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिका फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला… खऱ्या आयुष्यातही तिला तिचे छत्रपती संभाजी महाराज भेटले अशा भावना तिने व्यक्त केल्या आहेत… तसेच, प्राजक्ताने तिची आणि शंभुराज खुटवड यांची हटके लव्हस्टोरी देखील सांगितली आहे… दादा बोलण्यापासून सुरु झालेला तिचा प्रवास अहोंपर्यंत कसा येऊन पोहोचला जाणून घेऊयात…(Prajakta Gaikwad Engagement)

तर, प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराज यांची ओळख एका अपघातामुळे झाली होती… रात्रीच्या वेळी पुण्याच्या रस्त्यावर घडलेल्या एका अपघातामुळे दोघांचंही आयुष्य बदललं… राजश्री मराठीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ही फिल्मी लव्हस्टोरी प्राजक्ताने सांगितली…
झालं असं की, शंभुराजच्या कुटुंबियांच्या मालकीचा ट्रक प्राजक्ताच्या गाडीला धडकला आणि त्यांचा अपघात झाला होता. त्यामुळं संतप्त झालेल्या प्राजक्तानं ड्राव्हरला तुझ्या मालकाला बोलव असं सांगितलेलं. ड्रायव्हरने शंभुराजच्या मोठ्या भावाला फोन केला होता, पण ते दुसऱ्या कामात अडकल्यामुळे त्यांनी अपघातस्थळी शंभुराजला पाठवलं. शंभुराज तिथं आला आणि त्याने ती परिस्थिती हाताळली. तो ट्रेक ड्रायव्हर दारु प्यायला होता आणि हे समजल्यावर शंभुराजने त्याच्या दोन कानशिलात लगावल्या. या सगळ्या प्रकारानंतर प्राजक्ताला शूटिंगला जायचं होतं, त्यामुळे शंभुराजने “मी तुम्हाला शूटिंगला सोडतो”, असं म्हटलं…(Prajakta Gaikwad Lovestory)

सुरुवातीला अनोळखी असल्यामुळे प्राजक्ता शंभुराजला दादाच म्हणायची… तर या उलट शंभुराजनं मात्र प्राजक्ताच्या दादा म्हणण्याला कधीच ताई म्हणून रिप्लाय दिला नाही… महाराणी येसूबाईंच्या भूमिकेमुळं प्राजक्ताला प्रचंड मान-सन्मान मिळतो. वयानं मोठे असलेलेही तिला ताई म्हणूनच बोलतात. पण शंभुराज मात्र कधीच तिला ताई म्हणाला नाही, तो तिला नेहमीच मॅडम बोलतो, असं शंभुराजने मुलाखतीत सांगितलं.. प्राजक्ता म्हणाली की, “आमचं लग्न ठरल्यानंतर त्याने मला सांगितलं की, मी कधीच तुला ताई म्हणालो नाही…यानंतर मी चॅट चेक केलं…तर खरंच हा मला कधीच ताई म्हणाला नव्हता…नेहमी मॅडमच बोलायचा…”.
================================
हे देखील वाचा : Aranya : ‘अरण्य’मध्ये उलगडणार जंगल, भावना आणि संघर्षाची कहाणी
=================================
पुढे प्राजक्ता म्हणाली की, “१८ वर्षाची झाल्यानंतरच मला वेगवेगळ्या क्षेत्रातली स्थळं येऊ लागली. राजकीय, मोठे मोठे अधिकारी आयपीएस, आयएएस…अशी अनेक स्थळं आली होती, पण मला माझं शिक्षण पूर्ण करायचं होतं. त्यामुळे मी नकार दिला…”. “मला माझ्या फिल्म करिअरला सपोर्ट करणारा पार्टनर हवा होता. त्यामुळे या क्षेत्रात काम करताना जो सपोर्ट करेल, असाच जोडीदार मी शोधत होते. आणि शंभुराज आणि त्याच्या घरचे मला सपोर्ट करत असल्यामुळे हा योग जुळून आला”, असं देखील प्राजक्ता म्हणाली… प्राजक्ता गायकवाड हिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर आजवर तिने ‘चेकमेट’, ‘रामशेज’, ‘आई माझी काळूबाई’, ‘फौजी’, ‘गुगल आई’, ‘सिंगल’, ‘काटा किर्र’ अशा अनेक चित्रपटांमध्ये कामं केली आहेत… (Marathi Entertainment News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi