Prajakta Gaikwad चं ‘ठरलं’; फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना दिली

Prajakta Gaikwad चं ‘ठरलं’; फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना दिली गुड न्यूज !
मराठी टेलिव्हिजन विश्वात आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि ठसठशीत भूमिकांनी घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी मात्र तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एका खास क्षणामुळे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेमधून महाराणी येसूबाईंची भूमिका साकारत ती महाराष्ट्राच्या मनात कायमची घर करून गेली. तिच्या अभिनयशैलीने प्रेक्षक इतके प्रभावित झाले की अनेकांना तीच खरी ‘येसूबाई’ वाटू लागली.(Prajakta Gaikwad Engagement)

जेव्हा विक्की कौशलच्या ‘छावा’ या आगामी सिनेमात येसूबाईच्या भूमिकेसाठी रश्मिका मंदाना निवडली गेली, तेव्हा प्राजक्ताचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं. चाहत्यांनी सरळसरळ तुलना करत, “येसूबाई म्हटलं की फक्त प्राजक्ता!” असं ठाम मत नोंदवलं. तिच्या अभिनयाची तीव्र छाप अजूनही ताजी आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर, आता प्राजक्तानं तिच्या इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर करत एक आनंदाची बातमी दिली आहे. पारंपरिक साजशृंगार केलेली, डोक्यावर हळदीकुंकू, गळ्यात हार, आणि आजूबाजूला आप्तस्वकीयांचा गराडा हे सर्व पाहून चाहत्यांनी एकच जल्लोष केला आहे.

तिच्या नव्या पोस्टमध्ये, प्राजक्तानं एका साध्या पण भावनिक कॅप्शनसह चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. “प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा…” आणि त्यासोबतच तिने दिलेला हॅशटॅग #ठरलं या शब्दाने याने सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली. तिने हा निर्णय नेमका कोणासोबत घेतला? तिचा होणारा जोडीदार कोण? याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि समाधान स्पष्ट जाणवत होतं.(Prajakta Gaikwad Engagement)
================================
================================
प्राजक्ताच्या या नव्या प्रवासासाठी तिचे चाहते मनापासून शुभेच्छा देत आहेत. अभिनय क्षेत्रात दमदार वाटचाल केल्यानंतर, आता ती आयुष्यातील नव्या पर्वात प्रवेश करते आहे. तिच्या या खास क्षणात प्रेक्षक तिच्यासोबत आहेत आणि तिच्या पुढील निर्णयाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.