Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Netflix India 2026 : ‘इक्का ते ‘फॅमेली बिझनेस’; जाणून घ्या

Bigg Boss Marathi 6: आता होणार अजून धिंगाणा! बिग बॉसच्या

Ranpati Shivray Swari Agra Review : शिवरायांवर आलेला सर्वात बेस्ट

Divya Shinde : बिग बॉसच्या घरातील सदस्यांना थेट जीवे मारण्याची

Maharashtrachi Hasyajatra फेम Dattu More ची विनोदापाठोपाठ व्यवसायातही एंट्री; सुरु केलं

Gaurav More ने स्वतः सांगितले ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडण्याचे कारण म्हणाला,’सुरुवातीला ते मजेशीर

संगीतकार ओ पी नय्यर आणि Mohammad Rafi यांच्यातील मतभेद कसे

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam 2 आणि Jhimma 3 लवकरच येणार

Rajpal Yadav यांनी तिहार जेलमध्ये केलं सरेंडर; नेमकं प्रकरण काय?

Rashmika Mandanna : हुकमी फिल्मी अड्डा…. विमानतळ

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Prajakta Gaikwad साकारणार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची भूमिका

 Prajakta Gaikwad साकारणार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची भूमिका
मिक्स मसाला

Prajakta Gaikwad साकारणार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची भूमिका

by रसिका शिंदे-पॉल 05/02/2026

ऐतिहासिक वैभवाने नटलेल्या महाराष्ट्रातील वाड्यांमध्ये ‘भिडेवाडा’ हे नाव विशेष मानाने घेतले जाते. कारण ही वास्तू केवळ दगड–मातीची रचना नसून, ती आहे एका क्रांतीची साक्ष. महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी येथेच देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला. त्यामुळे ‘भिडेवाडा’ ही केवळ वास्तू न राहता, स्त्री शिक्षणाच्या ऐतिहासिक संघर्षाची आणि परिवर्तनाची साक्षीदार ठरली आहे. हाच ऐतिहासिक ‘भिडेवाडा’ आता मराठी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

शिवमुद्रा स्टुडिओज निर्मित आणि राघो फिल्म प्रस्तुत ‘भिडेवाडा’ या सामाजिक चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवानी राजेशिर्के आणि अजित शिरोळे यांनी केले असून, निर्मितीची जबाबदारी जयश्री शिरोळे आणि कावेरी जावळे यांनी सांभाळली आहे. तर सुप्रिया शिंदे, वैभव जोशी आणि राजू विटकर हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

================================

हे देखील वाचा : नाना पाटेकरांनी असं काय म्हटलं की Ajit Pawar चक्क लाजले होते…

================================

या चित्रपटात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची भूमिका अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड तर महात्मा जोतिराव फुले यांची भूमिका धीरेश जोशी साकारली आहे. या दोघांसोबत या चित्रपटात माधव अभ्यंकर, वैभव चव्हाण, ऋतुराज वानखेडे, नेहा सोनावणे, सम्राट शिरोळे, शरा गायकवाड, प्रदीप कोथमीरे, आनंद पिंपळकर, समद खान, प्रतिभा भगत, श्रीराम पेंडसे, निखिल निगडे, योगेश तनपुरे, पंकज चव्हाण व अनिरुद्ध देशपांडे हे कलाकार आहेत.

कथा अजित शिरोळे यांची असून पटकथा अजित शिरोळे अक्षय कट्टी यांची आहे. संवाद अक्षय कट्टी यांनी लिहिले आहेत गीते ईश्वर अंधारे यांनी लिहिली असून संगीत सागर शिंदे यांनी दिले आहे. संकलन राजेश बारबोले तर छायांकन योगेश कोळी यांचे आहे. कलादिग्दर्शन महेश गोरे तर ध्वनी अशोक झुरुंगे यांचे आहे. कार्यकारी निर्माते अमित माझीरे आहेत. इतिहासाची साक्ष आणि वर्तमानाचा संघर्ष यांची सांगड घालणारा ‘भिडेवाडा’ हा चित्रपट सामाजिक जाणिवांना स्पर्श करणारा महत्त्वपूर्ण सिनेअनुभव ठरणार आहे.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Chitchat bollywood update Entertainment krantijyoti savitribai phule Marathi Movie prajakta gaikwad
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.