Chhaava Box Office :’छावा’ची यशस्वी ओलांडला ३५० कोटींचा टप्पा

Prajakta Koli : Mostly Sane होणार नेपाळी कुटुंबाची सून
यंगस्टर्सची आवडती मोस्टली सेन अर्थात प्राजक्ता कोळी हिने तिच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. १३ वर्षांपासून अधिक काळ रिलेशनमध्ये असणाऱ्या प्राजक्ताने तिचा बॉयफ्रेंड वृषांक खनालसोबत अखेर लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. खरंतर गेल्या अनेकवर्षांपासून रिलेशनमध्ये असूनही प्राजक्ता कधीच आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल कुठल्याही सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर उघडपणे काहीही बोलली नव्हती. मात्र, आपल्या आवडत्या मोस्टली सेन प्राजक्ताच्या जीवनाचा जोडीदार नेमका कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागल्यामुळे अखेर तिने काही महिन्यांपूर्वी वृषांकसोबतचं रिलेशन जाहिर केलं. (Prajakta Koli)
‘मिसमॅच’, ‘जुग जुग जियो’, ‘ये शादी नही हो सकती’ अशा चित्रपट आणि वेब सीरीजमध्ये झळकलेल्या प्राजक्ताने तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मिडियावर पोस्ट केले आहे. सध्या क्लोज फ्रॅंड्स आणि मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न सोहळे धुमधडाक्यात करण्याचा जणू काही ट्रेण्डच आला आहे. आणि त्याच ट्रेण्डला फॉलो करत प्राजक्ता कोळी आणि वृषांक खनाल लग्नगाठ लवकरच बांधणार आहेत. प्राजक्ता-वृषांकच्या मेहंदीनंतर हळद आणि इतर पारंपरिक प्रथा संपन्न होणार असून मिळालेल्या माहितीनुसार २५ फेब्रुवारी २०२५ रोजी प्राजक्ता आणि वृषांक लग्न करणार आहेत. (Mostly Sane)

मुळची ठाणे गर्ल असणारी प्राजक्ता कोळी नेपाळी कुटुंबाची सून होणार आहे. गेल्या काही काळात तिने तिच्या आणि वृषांकच्या रिलेशनबद्दल आठवणींना उजाळा देत ९०च्या दशकातील इतर कपल्सप्रमाणे ब्लॅकबॅरी मॅसेंजरवर वृषांक आणि प्राजक्ताची लव्हस्टोरी सुरु झाली होती. दोघांच्याही कॉमन मित्रामुळे झालेली ही मैत्री कधी प्रेमात बदलली कळलंच नाही. बरं १३ वर्षांपेक्षा अधिक काळ सोबत असणाऱ्या प्राजक्ताला हे रिलेशन इतकी वर्ष पुढे जाईल अशी खात्रीच नव्हती पण वृषांकने कायमच तिला, तिच्या करिअरला सपोर्ट केल्यामुळे आज ते दोघेही आयुष्याची नवी सुरुवात नव्या बंधनाने करतायत. (Vrishank Khanal)
===========
हे देखील वाचा : Chhaava : चित्रपटातील एका गाण्यात दिसले प्रभू श्रीराम आणि मारुतीराय
===========
रेडिओ जॉकी ते लेखिका…
प्राजक्ता कोळीच्या करिअरबद्दल बोलायचे झाल्यास तिने रेडिओ जॉकी म्हणून सुरुवात केली होती. आणि त्यानंत करोना काळात खरंतर जसं बऱ्याच जणांनी आपलं करिअर बदललं किंवा काही जणांनी घरबसल्या काहीतरी नवीन ट्राय करुन पाहू असा विचार केला अगदी त्याचप्रमाणे प्राजक्ताने तिच्या Mosley Sane या युट्यूब चॅनल अगदी सामान्य लोकांना, किंवा 90’s च्या मुलांना रिलेट होतील असे व्हिडिओ करण्यास सुरुवात केली. म्हणजे त्यात प्राजक्ताने म्हणजे आई, बाबा, प्राजू आणि मॉंन्टू असं तिचं कुटुंब दाखवत त्यात होणाऱ्या गमतीजमती दाखवल्या आणि प्रेक्षकांनी तिच्या कॉंन्टेला उचलून धरलं. यानंतर प्राजक्ताने हळूहळू एक्टिंगला सुरुवात करत काही हिंदी चित्रपटांमध्येही विविधांगी भूमिका साकारल्या. बरं अभिनय, रेडिओ जॉकी, युट्यूबर, इन्फ्लूएन्सर इतक्यावरच तिचं काम थांबत नाही तर ती स्वत: एक सोशल वर्कर देखील आहे. प्राजक्ताने पर्यायवरणविषयक अनेक उपक्रमांसाठी परदेशातही भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. इतकंच काय तर मिशेल ओबामांनाही ती भेटली असून त्याचा स्पेशल व्लॉगही तिने तिच्या चॅनलवर पोस्ट केला होता. करिअरमध्ये अनेक शिखरं गाठल्यानंतर नुकतचं प्राजक्ताने तिचं ‘टू गूड टू बी ट्रू’ हे तिचं पहिलंच पुस्तक देखील प्रकाशित केलं होतं. (Bollywood News)
कोळींचा नेपाळचा जावई…
आता वळूयात मोस्टली सेनच्या नवऱ्याकडे. प्राजक्ता कोळीचा होणारा नवरा वृषांक खनाल हा पेशाने वकिल आहे. वृषांक कामांडूचा असून पहिल्यांदा प्राजक्ता आणि वृषांकची ओळख मित्राच्या घरी गणपती पूजेला झाली होती आणि त्यानंतर त्यांच्या प्रेम कहाणीला सुरुवात होत ती आता दोन्ही कुटुंबाच्या संमतीने लग्नापर्यंत येऊन पोहोचली आहे. मराठी मुलगी नेपाळची सून होणार या विचाराने प्राजक्ताचे चाहते फारच उत्सुक असून तिने पोस्ट केलेल्या मेहेंदीच्या व्हिडिओ, फोटोजवर कमेंचा वर्षाव करतायत. तर, दीया मिर्झा, विक्रांत मेस्सी, टिक्सा चोप्रा, गौहर खान अशा अनेक सेलिब्रिंटीनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. (Entertainment News)

लहानपणीच प्राजक्ताने आपल्या वडिलांना केलेली पैशांची मदत…
जाता जाता प्राजक्ताने तिच्या वडिलांसोबत एका पॉडकास्टमध्ये तिच्या बालपणीच एख भावूक क्षण शेअर केला होता. प्राजक्ताचे वडिल नोकरीला होते पण काही कारणास्तव त्यांच्या नोकरीत अडचण आली होती आणि त्यामुळे त्यांच्याकडील होते नव्हते ते सगळे पैसे संपले होते. आणि त्यावेळी प्राजक्ताला पिगी बॅंकमध्ये पैसे साठवण्याची सवय होती. प्राजक्ताच्या घरी पैशांची इतकी अडचण तेव्हा झाली होती की अगदी एकावेळेसच्या जेवणाची सोय होईल की नाही असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता आणि त्याचवेळी प्राजक्ताची पिगी बॅंक फोडली आणि त्यातून ते पैसे हातात आले त्यात त्याा घरखर्च निभावला. हा किस्सा सांगताना प्राजक्ता आणि तिच्या वडिलांचे डोळे पाणावले होते. आणि त्यावेळी तिचे वडिल असं देखील म्हणाले की त्यावेळेपासून आजपर्यंत प्राजक्ता आमचं घर चालवत आहे आणि मला हातभार लावत आहे याचा मला अभिमान आहे.