राष्टीय पुरस्कार सोहळ्यात Vidhu Vinod Chopra यांनी लाल कृष्ण अडवाणींसोबत

महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतून Prajakta Mali ची एक्झिट? नेमक कारण काय…
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आलाय. खळखळून हसवणारा विनोद, प्रत्येक कलाकाराची खणखणीत उपस्थिती, आणि मंचावरचा प्रामाणिक अभिनय यामुळे या शोने स्वतःचं वेगळं वलय तयार केलं. या यशात जितकी भर घालणारी गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका प्राजक्ता माळी. तिच्या समजूतदार, हसऱ्या आणि सहज सादरीकरणामुळे प्रेक्षकांनी तिला मनापासून स्वीकारलं. मात्र अलीकडेच प्रेक्षकांच्या लक्षात आलं की गेल्या काही भागांपासून प्राजक्ता मंचावर दिसत नाहीये. तिच्या अनुपस्थितीमुळे, ‘ती शोमधून बाहेर पडली का?’ असा प्रश्न अनेकांच्या मनात उमटतो आहे. या जागी आता प्रियदर्शनी इंदलकर सूत्रसंचालन करताना दिसते आहे. ती देखील अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी कलाकार, पण तरीही प्राजक्ताची उणीव ठसठशीत जाणवते.(Actress Prajakta Mali )

सोशल मीडियावर पाहिलं तर प्राजक्ता सध्या वेगळ्याच अध्यात्मिक प्रवासात आहे. तिच्या पोस्टमधून स्पष्ट होतं की ती सध्या केदारनाथ, बद्रीनाथ या पवित्र स्थळी आपल्या आईसोबत देवदर्शनाला गेली आहे. हा प्रवास केवळ पर्यटनाचा नसून, तिच्या वैयक्तिक शांततेचा एक भाग असल्याचं ती सूचित करते. पण यामुळेच प्रेक्षकांना वाटू लागलं की, ती ‘हास्यजत्रा’मध्ये परतणारच नाही का?

याआधीही काही वेळा प्राजक्ताने इतर प्रोजेक्ट्समुळे शोमधून काही काळासाठी ब्रेक घेतला होता. पण यावेळी तिची अनुपस्थिती फारच लांबली आहे. जवळपास महिनाभर ती मंचावर दिसली नाही. त्यामुळे हा केवळ विश्रांतीचा कालावधी आहे, की खरंच तिने शोला अलविदा केलय, यावर अजूनही कोणतंही स्पष्ट उत्तर मिळालेलं नाही. सोनी मराठीकडूनही किंवा प्राजक्ताकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.प्राजक्ता माळीच्या चाहत्यांसाठी ही प्रतिक्षा थोडी अस्वस्थ करणारी आहे. कारण ती केवळ एक सूत्रसंचालिका नव्हती, तर ‘हास्यजत्रा’ची जान होती. तिच्या हास्याने आणि सहज संवादशैलीने प्रेक्षकांना आपलंसं वाटायचं. म्हणूनच आज ती मंचावर नसताना, तो एक कोपरा रिकामा वाटतोय.(Actress Prajakta Mali)
============================
============================
प्राजक्ताच्या कारकिर्द पाहीली, तर ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेने तिला घराघरात पोहोचवलं. त्यानंतरच्या अनेक मालिकांतून आणि चित्रपटांतून तिची बहुपदरी कलाकार म्हणून ओळख निर्माण झाली. नुकताच आलेला ‘फुलवंती’ हा सिनेमा याला उत्तम उदाहरण. अभिनयाबरोबरच तिने या सिनेमाची निर्मितीही केली आणि प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरली. तिने खरंच शो सोडला आहे का? की ही फक्त एक छोटासा ब्रेक आहे? याचं उत्तर वेळच देईल. पण एक गोष्ट नक्की, प्राजक्ता माळी पुन्हा ‘हास्यजत्रा’मध्ये आली, तर तिचं स्वागत केवळ टाळ्यांनीच नाही, तर मनापासून होईल.