
Prajakta Mali : “तिने कशालाच हद्दपार…”, प्राजक्तानं केलं आलिया भट्टचं कौतुक
हिंदी चित्रपटसृष्टीत प्रामुख्याने नेपोटिझम हे कल्चर फार मोठ्या प्रमाणात दिसतं. यात मग बचच्न, कपूर, खान अशा अनेक दिग्गज कलाकारांची पोरं आज अभिनय, दिग्दर्शन किंवा अन्य मनोरंजन क्षेत्रातील हुद्द्यांवर आपलं टेलेंट सादर करताना दिसतात. त्यापैकी काहीजणं खरंच त्यांच्या पालकांची अॅक्टिंगची किंवा कुठलीही वेगळी यशस्वीपणे पुढे नेताना दिसतात तर काहीजणं केवळ स्टारकिड्स असल्यामुळे त्यांना चित्रपटसृष्टीत ब्रेक मिळाला आहे असं भासतं. यात दिग्दर्शक महेश भट्ट यांची लेक आलिया भट्ट- कपूर हिने आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे. आणि याच आलियाचं मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने तोंड भरुन कौतुक केलं आहे. (Prajakta Mali)
आलिया भट्ट(Alia Bhatt) हिने २०१२ मध्ये यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या स्टुंडट ऑफ द इअर या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. त्यावेळी खरंतर तिच्या अभिनयावर अनेक ताशेरे ओढले गेले किंवा तिला अभिनय येतचं नाही अशाही टिका झाल्या. पण त्यानंतर ‘राझी’, ‘गली बॉय’, ‘कलंक’, ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘आरआरआर’, ‘डार्लिंग्स’ या चित्रपटातून तिने स्वत:चं अस्तित्व आणि वेगळपण सिद्ध करुन दाखवलं. बरं इतकंच नाही तर थेट राष्ट्रीय पुरस्कारावरही तिने नाव कोरलं. तिच्याबद्दल ‘सुमन म्युझिक मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना प्राजक्ता माळी असं म्हणाली की, “ती वेगवेगळे जे काही ट्राय करत असते, ते मला आवडतं. तिने कशालाच हद्दपार केलेलं नाही. ती सगळ्याच गोष्टी करत असते. मला त्या मुलीचं कौतुक वाटतं. मुलगी, नवरा, संसार इतकं सगळं असून ती करिअरमध्ये यशाच्या शिखरावर आहे. हे छान आहे, हे जमलं पाहिजे”. (Entertainment Tadaka)
================================
================================आलिया भट्टच्या (Alia Bhatt) आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती फिमेल स्पाय युनिवर्सच्या ‘अल्फा’ (Alpha) या चित्रपटात झळकणार असून यात तिच्यासोबत ‘मुंज्या’ फेम अभिनेत्री शर्वरी वाघ (Sharvari Wagh) देखील असणार आहे. आलिया जितकी तिच्या प्रोफेशनल कामांमुळे चर्चेत असते तितकीच ती तिच्या वैयक्तिक जीवनामुळेही लाईमलाईटमध्ये असते. तिची लेक राहा सध्या सोशल मिडिया सेन्सेशन ठरली असून तिने करीना आणि सैफ अली खानचा मुलगा तैमुर (Timur) यालाही मागे टाकलं आहे. (Bollywood News)

तर, अभिनेत्री प्राजक्ता माळी ‘फुलवंती’ या चित्रपटाच्या निर्माती भूमिकेतून आता पुन्हा एकदा अभिनेत्री म्हणून ‘चिकी चिकी बुबूम बूम’ या चित्रपटात झळकणार आहे. प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटात स्वप्नील जोशी, वनिता खरात, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, प्रार्थना बेहेरे हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सध्या ती ‘’महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्पमाचं सुत्रसंचलन करत असून त्याच टीमसोबत पहिल्यांदाच मोठ्य पडद्यावर ती काम करणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्येही उत्सुकता वाढू लागली आहे.(Marathi films)