‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
प्राण ने स्वत:ला मिळालेला फिल्मफेअर पुरस्कार नाकारला…
भारतीय सिनेमाचे ऑस्कर म्हणजे फिल्मफेअर पुरस्कार! आजही या पुरस्काराचा दर्जा व रसिकांवरील प्रभाव अबाधित आहे. हा पुरस्कार मिळणं हा प्रत्येक कलावंताचं स्वप्न असतं. पण असं असतानाही हा पुरस्कार अभिनेता प्राण यांनी चक्क नाकारला होता आणि त्याचं कारण देखील तितकच ’स्ट्रॉंग’ होतं व प्राणचे मोठेपण अधोरेखित करणारं होतं. कारण हा पुरस्कार त्याने वैयक्तिक कारणासाठी नाकारला नव्हताच. ही गोष्ट आहे १९७२ च्या फिल्मफेअर अॅवार्ड सेरेमनीची! या वेळी प्राण यांना सोहनलाल कंवर यांच्या ’बेईमान’ या सिनेमातील रामसिंग हवालदाराच्या भूमिकेकरीता सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. (Filmfare)
हा पुरस्कार त्यांनी नाकारला. का ? कारण याच फिल्मफेअर सोहळ्यात याच ’बेईमान’ सिनेमाचे संगीतकार शंकर जयकिशन यांना सर्वोत्कृष्ट संगीताचा फिल्मफेअर मिळाला होता ! कुणाशी टक्कर देवून? तर कमाल अमरोहीच्या ’पाकीजा’ (सं गुलाम महंमद) ला! आज बेईमानचं एकही गाणं आठवायचं म्हटल तरी आठवत नाही आणि पाकीजाचं एकूण एक गाणं लख्खं आठवतं ! प्रश्न फक्त एवढाच नव्हता.पाकीजाचे संगीतकार गुलाम महंमद यांच निधन १९६६ ला झालं होतं.(Filmfare)
(पाकीजाचा निर्मितीचा कालावधी १०-१२ वर्षाचा होता.) पाकीजाची नायिका मीनाकुमारीचं निधन सिनेमा रीलीज नंतर काही दिवसातच झाले होते. एकूणच पाकीजाच्या बाबत गुणवत्तेसोबतच एक सांत्वनाची भावना होती. असे असताना त्यावर्षी एक नाही दोन नाही चक्क पाच पाच पारितोषिके ’बेईमान’ ला मिळतात ही भावना कुणाही रसिकाला चीड आणणारी होती.
प्राणची अवस्था देखील वेगळी नव्हती. त्याने काय करावे ? त्याने स्वत:ला मिळालेला पुरस्कार नाकारून निषेध व्यक्त केला. आज पुरस्कारासाठी लॉबिंग करणारे बघितल्यावर प्राणचे हे वेगळेपण आणखी उठून दिसते.प्राण एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी चक्क फिल्मफेअर मासिकाचे संपादक करंजिया यांना एक पत्र लिहिले. या पत्रातील भाषा पहा. हे पत्र पुढीलप्रमाणे होते.(Filmfare)
Dear sir, I would be failing in my duty towards the film industry which has made me where ever I am today, by not accepting one of the awards which are not fair this time. I will strongly feel the Filmfare committee has been unfair in not giving the award for the best music director to late Shri Ghulam Mohammad for tremendous music for his film Pakeeza. Since the days these awards were announced my concise has been telling me and I cannot bear it any more. I would appreciate if you please relive me from the Burdon for receiving best supporting actor award trophy. By not accepting this award I do not mean any personal disrespect to you or to my numerous fans who had voted for me. On the contrary I am thankful to them. I regreate to inconvenience caused to you. But I could not reconcile with the idea of filmfare award trophy of ‘Beimaan’ is staring at me when I am alone at home and reminding me I am part of to something unfair. Please forgive me.
-Pran
=========
हे देखील वाचा : जेव्हा अभिनेत्री मधुबालाने संपूर्ण युनिटसाठी चक्क जेवण बनवले !
=========
अर्थात याचा इम्पॅक्ट काय झाला ? पुढे प्राणला नामांकन मिळाली पण एकही पुरस्कार मिळाला नाही ! १९९७ साली ’जीवन गौरव’पुरस्कार तेवढा मिळाला.