Prarthana Behre : “नवऱ्यासोबत ड्रीम कोलॅबोरेशन”; प्रार्थनाची नवी घोषणा!

Prarthana Behre : “नवऱ्यासोबत ड्रीम कोलॅबोरेशन”; प्रार्थनाची नवी घोषणा!
मालिका आणि चित्रपटविश्वात १५ वर्षांपेक्षा अधिक काळ काम करणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behre) पहिल्यांदाच आपल्या नवऱ्यासोबत काम करताना लवकरच दिसणार आहे. नुकतीच ती ‘बाई गं’ आणि ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटांमध्ये दिसली होती. आता नवरा अभिषेक जावकरसोबत काम करणार असून आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन प्रार्थनाचा नवरा करणार असून ती अभिनय करणार आहे. (Marathi movie)

प्रार्थना बेहेरचा नवरा अभिषेक जावकर हा निर्माता असून आत्याचं स्वत:चं रेड बल्ब स्टुडिओ आहे. आता या प्रोडक्शन हाऊसअंतर्गत अभिषेक त्याच्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून पहिल्यांदाच त्याच्या चित्रपटात प्रार्थना बेहेरे अभिनय करणार आहे. प्रार्थना नवऱ्यासोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे. तिने नुकतेचं मुहुर्ताचे फोटो शेअर करत लिहिले, “नवीन भूमिकेत एकत्र पाऊल ठेवत आहोत. मी अभिनेत्री तर अभिषेक दिग्दर्शक. नवऱ्यासोबत ड्रीम कोलॅबोरेशन. तुमचं प्रेम आणि प्रार्थना सोबत असूद्या.” (Prarthana behre)
======================================
हे देखील वाचा: Amitabh Bachchan : ….आणि नीना कुळकर्णींसाठी संपूर्ण टीमला बच्चन साहेबांनी समजावलं!
=======================================
दरम्यान, चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात असून प्रार्थना व्यतिरिक्त अजून कोणते कलाकार असणार आहेत हे देखील जाहिर केलं गेलं नाही आहे. पण नवरा बायकोचा हा पहिला प्रोजेक्ट नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन करेल अशी आशा आहे. या पूर्वी अभिषेक जावकरने २०१६ साली आलेला ‘मिसिंग ऑन अ वीकेंड’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. (Abhishek javkar movies)