‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Prasad Jawade आणि अमृताने अचानक सोडले राहते घर,व्हिडिओ पोस्ट करत अभिनेत्रीने सांगितले खरे कारण…
कामाच्या गरजेनुसार अनेक कलाकारांना त्यांच्या कुटुंबापासून दूर राहावं लागतं, कारण शूटिंगसाठी त्यांना वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रवास करावा लागतो. मात्र काही कलाकार आपल्या कुटुंबासोबतच कामाच्या ठिकाणी स्थायिक होतात. झी मराठीवरील सुपरहिट मालिकेतील आदित्यची भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद जवादे यांनीही आपल्या कुटुंबासोबत साताऱ्यात स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला होता.(Actor Prasad Jawade)

गेल्या दीड ते दोन वर्षांपासून पारू मालिकेचं शूटिंग साताऱ्यातील एका आलिशान बंगल्यामध्ये सुरू होतं. हा व्हिला दहिवड आष्टी गावाजवळ, उरमोडी धरणाच्या परिसरात होता. मालिकेच्या टीमने आता या आलिशान बंगल्यामधील शूटिंग पूर्ण करून मुंबईकडे परतण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलाबाबत अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख यांनी आपल्या यूट्यूब व्लॉगद्वारे चाहत्यांना माहिती दिली. अमृता व्हिडिओत म्हणाली की, “मी आणि प्रसाद आता साताऱ्यातील घर सोडत आहोत, कारण पारू मालिकेचं शूटिंग आता मुंबईत सुरू होणार आहे. गेली दीड ते दोन वर्ष आम्ही साताऱ्यात राहत होतो आणि या घराने आम्हाला खूप आठवणी दिल्या. साताऱ्यात राहून खरंच खूप छान वाटलं.”

प्रसाद जवादेने सांगितलं, “माझ्या आईची प्रकृती या साताऱ्याच्या घरातच पूर्णपणे बरी झाली. ती आता खूप छान आहे, त्यामुळे या घराबरोबर आमचं खूप काही जोडलेलं आहे. आम्हाला येथे राहून खूप आठवणी मिळाल्या आहेत.”सध्या पारू मालिकेत आदित्य आणि पारूचं लग्न झाल्यानंतर खोटं बोलल्यामुळे अहिल्यादेवीने त्यांना घराबाहेर काढलं आहे. तरीही, दोघे अहिल्यादेवीचं मन जिंकण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. नुकताच झी मराठी पुरस्कार सोहळ्यात पारू आणि आदित्यला सर्वोत्कृष्ट मुलगा व मुलीचा पुरस्कार मिळाला.(Actor Prasad Jawade)
=============================
=============================
प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना बिग बॉसच्या घरापासूनच खूप आवडली. घराबाहेर आल्यावर त्यांनी साखरपुडा झाल्याचं सांगितलं, ज्याने चाहत्यांना आनंदाचा धक्का मिळाला होता.