Manoj Kumar : पंतप्रधान इंदिरा गांधींशी थेट भिडलेले ‘भारत कुमार’!

Prasad Oak : प्रसाद-मंजिरीच्या लग्नात सासूबाई ‘या’ कारणामुळे रडल्या!
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय आणि सध्याचं ट्रेनिंग कपल म्हणजे प्रसाद ओक (Prasad oak) आणि मंजिरी ओक… नवऱ्याने अभिनेता ते दिग्दर्शक हा प्रवास केला आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून मंजिरीने निर्माती म्हणून एक नवा प्रवास सुरु केला… लवकरच त्यांचा सुशीला सुजीत हा आगामी चित्रपट येणार आहे… एकीकडे चित्रपटाची चर्चा तर आहेच पण तुम्हाला मंजिरी आणि प्रसाद ओकचं लग्न नेमकी कुठे झालं होतं आणि त्यांच्या लग्नात सासूबाई का रडल्या होत्या ते माहित आहे का? वाचा हा किस्सा…(Prasad and Manjiri oak)
प्रसाद ओकने लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये लग्नातील एक गंमतीशीर किस्सा सांगितला होता… प्रसाद म्हणाला की, “लग्न झालं तेव्हा माझं नाटक चालू होतं. राजा गोसावी यांचं ‘भ्रमाचा भोपळा’ नावाचं नाटक मी करत होतो. लग्नाच्या आदल्या दिवशीही प्रयोग होता आणि दुसऱ्या दिवशी तर तीन प्रयोग होते. तो माझ्या करिअरचा सुरुवातीचा काळ होता. त्यामुळे काम करायला लागणार होतंच काही पर्यायच नव्हता. तर आदल्या दिवशीचा प्रयोग संपवून मी लाल डब्याच्या एसटीने पुण्याला गेलो आणि थ्री फोर्थ पॅन्ट घातली होती. मला पूर्ण कपडे आवडतच नाहीत. थ्री-फार्थ, सिव्हलेस शर्ट असाच माझा वेश असतो. मी तसाच कार्यालयात गेलो. तर हिची आई दरवाजात वाट बघत होती, मी कधी येतोय.”(Prasad oak)
============
हे देखील वाचा :Laxmikant Berde : “बारामतीचे आहात म्हणून खुर्चीचा मोह”, बेर्डेंचं ‘ते’ अॅडिशन
============
पुढे तो किस्सा सांगताना मंजिरी म्हणाली, “७ तारखेला आमचं लग्न होतं. ६ तारखेला कार्यक्रम होता आणि संध्याकाळी ५ वाजले तरीही हा आलाच नव्हता. म्हणजे सगळे कार्यक्रम सुरू होणार होते. नातेवाईक येत होते.” (Bollywood gossip)
पुढे प्रसाद म्हणाला की, “मी आलो आणि त्या (सासूबाई) म्हणाल्या, ‘तुम्ही आला का…तयार व्हा.’ तर माझी खेचायची सवय आहे. त्यामुळे मी म्हटलं की, तयार काय व्हायचं. मी असंच येणार आहे. त्यानंतर त्या आतमध्ये जाऊ रडायला लागल्या. अगं ते लग्नाला अर्ध्या पॅन्टमध्ये उभे राहणार आहेत, असं मंजिरीला सांगून त्या रडत होत्या”. (Bollywood tadaka)

पुढे मंजिरी म्हणाली,“आई मला म्हणत होती कीअगं ते एवढे कपडे घेतलेत. आता ते मग काय करायचे? लोकं काय म्हणतील मंजू? आपल्या गावाकडची लोकं आहेत. अगं ते अर्ध्या पॅन्टमध्येच उभे राहणार म्हटलेत. मी म्हटलं, आई अगं ती थ्री-फार्थ आहे. दुसरं म्हणजे तो असा राहणार नाही. ती म्हणाली, तू पहिलं खाली चल…तू त्यांना काय ते सांग.”(Entertainment news)
पुढे आणखी एक लग्नाचा भन्नाट किस्सा सांगत प्रसाद म्हणाला, “आजकाल लग्न मॅरेज हॉल वगैरेमध्ये होतात. हॉलमध्ये लग्न होणं हे पुर्वापारपासून चालत आलं आहे. आमचं लग्न दुकानात झालं. कुठल्याही मंगल कार्यालयाला एक गेट असतो ना. आमच्या मंगल कार्यालयात शटर होतं. त्यामुळे मी त्यावेळी म्हणालो होतो की आपलं लग्न दुकानात आहे.”(Untold stories)
============
हे देखील वाचा : Raj Thackeray : राज-शर्मिला ठाकरेंच्या लव्हस्टोरीशी वंदना गुप्तेंचं कनेक्शन काय?
============
“मी म्हटलं त्याला तुला शटर उघडायला लागलं का? ते आधीपासून उघडलेलंच आहे ना आणि मोठा हॉल होता. तो पुण्यातला प्रसिद्ध हॉल आहे. अनेक वर्षांचा तो जुना हॉल आहे. हा जे सांगतोय जुना हॉल वगैरे. पण उलट आपल्या लग्नाच्या वेगळीस त्यांनी रिनोव्हेट केला होता. नवाकोरा केला होता. पण हा तेव्हापासून मला बोलतो आपलं लग्न दुकानात झालंय,”अशी पुढे लग्नाची गोड आठवण मंजिरीने सांगितली…(Marathi celebrities untold stories)

दरम्यान, प्रसाद ओकच्या चित्रपटांबद्दल सांगायचं झालं तर आजवर ‘धर्मवीर’(Dharmaveer), ‘फुलवंती’, ‘धुरळा’, ‘कान्हा’, ‘फुल ३ धमाल’, ‘दोघात तिसरा आता सगळं विसरा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्याने कामं केली आहेत… लवकरच तो ‘महापरिनिर्वाण’ या बायोपिकमध्येही दिसणार असून निळू फूले (Nilu Phule) यांच्या जीवनावरही तो चित्रपट लवकरच घेऊन येणार आहे… (Marathi films)