Prasad Oak : ‘वडापाव’मध्ये दिसणार गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी

Prasad Oak : ‘वडापाव’मध्ये दिसणार गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी
अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक कायमच प्रेक्षकांसाठी मनोरंजक चित्रपट घेऊन येत असतो… आता लवकरच त्याचा अभिनेता म्हणून १००वा चित्रपट वडापाव भेटीला येणार असून यात प्रेक्षकांना गोड कुटुंबाची तिखट कथा पाहायला मिळणार आहे… वडा जसा तिखट-चुरचुरीत असतो तसंच नात्यांमध्येही गोडवा आणि तिखटपणा असला तरच ती नाती खरी रंगतदार होतात. अगदी हाच अनुभव देणारा कौटुंबिक चित्रपट ‘वडापाव’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाल टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून ही रुचकर पाककृती प्रसाद ओक प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. प्रसाद ओक याचा अभिनय कारकिर्दितील हा १००वा चित्रपट असून यात तो अभिनेता आणि दिग्दर्शक या दोन्ही भूमिका सांभाळणार आहे…

दरम्यान, वडापाव या चित्रपटाच्या टीझरमध्ये वडापावची रेसिपी दाखवत प्रसाद ओकने परदेशातही आपल्या महाराष्ट्राच्या वडापावची शान कशी राखून ठेवली आहे हे दिसतं… वडापाव चित्रपटाबद्दल आपली प्रतिक्रिया देताना दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणाला की, ‘’ ‘वडापाव’ एक अशी गोष्ट आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतेच. हाच आमच्या चित्रपटाचा गाभा आहे. कुटुंब, त्यांच्या नात्यांतील गोडवा-तिखटपणा आणि त्यातून मिळणारा भावनिक व विनोदी अनुभव अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडावा, असाच आमचा प्रयत्न आहे.’’
================================
=================================
या चित्रपटात प्रसाद ओक, अभिनय बेर्डे, गौरी नलावडे, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रेक्षकांना गरमागरम ‘वडापाव’ची चव २ ऑक्टोबर २०२५ रोजी चित्रपटगृहात सहकुटुंब सहपरिवार घेता येणार आहे…