Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

 All Is Well Marathi Movie: तीन मित्रांची धमाल गोष्ट ‘ऑल

Gaadi Number 1760: प्रेमभावनेला स्वरबद्ध करणारे प्रथमेश-प्रियदर्शिनीचे ‘झननन झाला’ गाणं

Dostana : ‘मेरे दोस्त किस्सा ये क्या हो गया…’हे गाणे

Aamir Khan याच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाचं कलेक्शन झालंय तरी

‘रंगभूमीवर फुललेली प्रेमकहाणी, कशी झालेली Reema Lagoo आणि Vivek Lagoo

Shubhvivah मालिकेत चिन्मय उद्गीरकरची एंट्री; आकाशच्या जीवासाठी भूमी करणार संघर्ष

Ye Re Ye Re Paisa 3: सलमान खान, महेश मांजरेकर यांच्या

Kajol : “‘तिथे शूटिंग करताना मला नेहमीच अस्वस्थ वाटत होतं”

Sachin Pilgoankar- रंजिताचा ‘आंखियों के झरोखो से’आठवतो का?

Housefull 5 : मल्टिस्टार कास्ट असूनही अक्षय कुमारच्या चित्रपटाचं कलेक्शन

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Prasad Oak प्रसाद ओकने केली नव्या बायोपिकची घोषणा, दिसणार ‘या’ दिग्गज दिग्दर्शकाच्या भूमिकेत

 Prasad Oak प्रसाद ओकने केली नव्या बायोपिकची घोषणा, दिसणार ‘या’ दिग्गज दिग्दर्शकाच्या भूमिकेत
कलाकृती तडका

Prasad Oak प्रसाद ओकने केली नव्या बायोपिकची घोषणा, दिसणार ‘या’ दिग्गज दिग्दर्शकाच्या भूमिकेत

by Jyotsna Kulkarni 14/01/2025

आपल्या आजवरच्या मनोरंजनाच्या इतिहासात डोकावले तर जाणवेल की, आपल्याला देशाला, राज्याला अनेक दिग्गज आणि महान कलाकारांचा वारसा लाभलेला आहे. अगदी दादासाहेब फाळके यांच्यापासून ते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यापर्यंत अनेक प्रतिभावान कलाकार आपल्या सिनेसृष्टीमधे होऊन गेले. या सर्वांनी आपल्या मनोरंजनविश्वाला कायम सतत उंचीवर नेण्याचे काम केले. (Marathi Entertainment Industry)

मराठी सिनेसृष्टीतील असेच एक मोठे नाव म्हणजे बाबुराव पेंटर (Baburao Painter). कदाचित आजच्या पिढीला हे नाव नवीन असेल मात्र या व्यक्तीने मराठी चित्रपटांना मोठे करण्यात सिंहाचा वाटा उचलला. आता अचानक यांचा विषय येण्याचे कारण देखील खूपच खास आहे. आपल्या इतिहासात किंवा समाजात होऊन गेलेल्या, असलेल्या अनेक मोठ्या व्यक्तींची आजच्या पिढीला किंवा आजच्या काळाला, येणाऱ्या काळाला ओळख करून देण्यासाठी ‘बायोपिक‘ चित्रपट बनवले जात आहे.

आजपर्यंत अनेक बायोपिक सिनेमे मनोरंजनविश्वात झाले आहे. लवकरच मराठीमध्ये अतिशय दमदार बायोपिक येऊ घातला आहे. हा बायोपिक आहे प्रसिद्ध चित्रकार, शिल्पकार आणि चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांच्यावर आधारित. अभिनेता प्रसाद ओकने (Prasad Oak) नुकतीच या सिनेमाची घोषणा केली आहे. प्रसाद ओक लवकरच बाबुराव पेंटर या सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहे. (Prasad Oak)

प्रसादने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. प्रसादने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “मराठी चित्रपट सृष्टी उभी करण्यात मोलाचा वाटा असणारी अनेक व्यक्तिमत्व होऊन गेली. त्यातलंच एक महत्वाचं आणि मानाचं नाव म्हणजे, “बाबुराव पेंटर“. (prasad oak to portray baburao painter)

View this post on Instagram

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)

“बाबुराव पेंटर“ यांच्या जीवनावर आधारित एक भव्य दिव्य कलाकृती निर्माण होत आहे. मदन माने आणि त्यांची संपूर्ण टीम ही कलाकृती निर्माण करण्यासाठी अविरत झटत आहे…!!! चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, कला दिग्दर्शक, इंजिनियर, छायाचित्रकार अशा अनेक बाजू लिलया सांभाळणारा हा अवलिया म्हणजेच “बाबूराव पेंटर”.”

“बाबूराव पेंटर” यांची भूमिका साकारायला मिळणं हा श्री नटराजाचा आणि गणपती बाप्पाचा मला मिळालेला आशीर्वाद आहे असं मी मानतो. ही भूमिका साकारण्याची संधी मला देणारे आमचे दिग्दर्शक मदन माने यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो…!!!

माझ्या आजपर्यंत च्या सर्व कलाकृतींवर आपण मायबाप रसिकांनी जसं प्रेम केलंत… जसा आशीर्वाद दिलात… तसंच प्रेम आणि आशीर्वाद या ही भूमिकेला आणि कलाकृतीला मिळो हीच रसिक मायबाप चरणी प्रार्थना…!!! या चित्रपटाबद्दलची सविस्तर माहिती आम्ही लवकरच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू…!!!”

दरम्यान प्रसादच्या या पोस्टवर नेटकऱ्यांसोबतच कलाकारांनी देखील कमेंट्स करत त्याचे अभिनंदन केले आहे. मागच्या वर्षी प्रसादच ‘धर्मवीर २‘ (Dharmaveer 2) सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. २०२५ हे वर्ष प्रसादसाठी खूपच खास असणार आहे. (Prasad Oak Post)

===============

हे देखील वाचा : Sunny Deol : या अभिनेत्यांमध्ये तब्बल सोळा वर्षांचा अबोला होता.

===============

प्रसादचा सस्पेन्स थ्रिलर ‘जिलेबी’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शत होत आहे. नुकताच या सिनेमाचा उत्कंठावर्धक ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे. तर मे २०२५ मध्ये त्याचा ‘गुलकंद’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या दोन्ही चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच प्रसाद दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्यावर येऊ घातलेल्या बायोपिक सिनेमाचे देखील दिग्दर्शन करत आहे. शिवाय एप्रिल २०२५ महिन्यात प्रसाद ओक दिग्दर्शित ‘सुशीला – सुजीत’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Featured Marathi Movie प्रसाद ओक प्रसाद ओक आणि बाबुराव पेंटर प्रसाद ओक पोस्ट बाबुराव पेंटर बाबुराव पेंटर बायोपिक
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.