‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेतून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट; ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता

१३,३३३ वा प्रयोग, आपत्तीग्रस्तांना १३ लाख ३३३ रुपयांची मदत; Prashant Damle यांची कौतुकास्पद कामगिरी
चित्रपट, मालिका आणि प्रामुख्याने नाट्यसृष्टीत विविधांगी भूमिका साकारणारे अभिनेते प्रशांत दामले ४० वर्षांपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत… चित्रपटांपेक्षा रंगभूमीवर रमणाऱ्या प्रशांत दामले यांनी नुकताच एक रेकॉर्ड केला… ४२ वर्षांच्या इंडस्ट्रीतील कारकिर्दीत त्यांनी नाटकाचे १३,३३३ प्रयोग पूर्ण केले आहेत… आणि याच रेकॉर्डचे अवचित्य साधत त्यांनी महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्तांसाठी १३ लाख ३३३ रुपयांची मदत मुख्यमंत्री साहाय्यता निधीकडे सुपूर्द केली आहे… सर्व स्तरांतून त्यांचे चाहते दामलेंचं कौतुक करत आहेत… (Prashant Damle)

दरम्यान, प्रशांत दामले यांनी याबद्दल फेसबुकवर पोस्ट करत लिहिलं आहे की, “माझ्या कारकीर्दीतील १३, ३३३वा प्रयोग १६ नोव्हेंबर रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात संपन्न झाला. आजवर माझ्या प्रत्येक प्रयोगाला जसा रसिकप्रेक्षकांचा प्रतिसाद असतो तसाच उदंड प्रतिसाद आणि प्रेम मला यावेळीही अनुभवता आलं. या विशेष कार्यक्रमावेळी एक ‘खारीचा वाटा’ म्हणून, माझ्याकडून आणि समस्त नाट्यरसिकांच्या वतीने महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्तांना १३ लाख ३३३ रुपयांची मदतही मुख्यमंत्री साहाय्यता निधीला दिली.” (Marathi Plays)
================================
================================
तसचे, प्रशांत दामलेंच्या १३,३३३ व्या प्रयोगानिमित्त त्यांचे नाव विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवण्यात आले आहे…. सर्वाधिक नाटकांत काम करणारे कलाकार म्हणून त्यांच्या नावावर नवा विक्रम नोंदवण्यात आला असून ते मराठी रंगभूमीत सर्वाधिक नाटक सादर करणारे ‘विक्रमादित्य’ कलाकार देखील ठरले आहेत… त्यांच्या विक्रमांची यादी इथेच संपत नाही.. यापूर्वी दामलेंच्या नावावर दिवसाला सर्वाधिक नाट्यप्रयोग आणि वर्षाला सर्वाधिक नाट्यप्रयोग करणारे अभिनेते म्हणूनही विक्रम नोंदवण्यात आले आहेत. (Entertainment News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi