
Prateik Smita Patil : आता बब्बर नाही ‘प्रतीक स्मिता पाटील’ म्हणायचं!
रंगाने काळ्या सावळ्या पण सौंदर्य हिंदी चित्रपटसृष्टीतील टॉपच्या अभिनेत्रीलाही मागे टाकेल असं होतं. चित्रपटृष्टीत केवळ १२ वर्ष काम करुन आजन्म आपली ओळख अजरामर करत प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरुपी आपली छाप उमटवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. स्मिता पाटील यांचं करिअर जितकं कौतुकास्पद होतं तितकचं त्यांच्या वैयक्तिक जीवनात अनेक वादळं होती. राज बब्बर यांच्यासोबत रिलेशन आणि त्यानंतर त्यांच्यासोबत केलेलं लग्न कायमच इंडस्ट्रीमध्ये चर्चेचा विषय ठरलं. नुकतंच त्यांच्या मुलाने प्रतिक बब्बरने आपल्या नावासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे त्याचं अधिकृत नाव प्रतीक राज बब्बर नसून प्रतीक स्मिता पाटील असं असणार आहे. आपल्या नाव बदलण्याच्या निर्णयावर प्रतीक काय म्हणाला आणि नेमकं स्मिता यांचं राज यांच्यासोबतचं नातं कसं होतं? काय अडचणी होत्या जाणून घेऊयात…(Prateik Babbar)
प्रतीक बब्बरने (Prateik Smita Patil) काही दिवसांपूर्वी गर्लफ्रेंड आणि लिव्ह इन पार्टनर प्रिया बॅनर्जी हिच्याशी लग्नगाठ बांधली. त्याने त्याच्या लग्नात वडिल राज बब्बर (Raj Babbar) यांना आमंत्रण दिलं नव्हतं. यावरुन चर्चा सुरुच होत्या की प्रतीकने आणखी एक बॉम्ब टाकला आहे. यापुढे प्रतीक वडिलांचे नाही तर आई स्मिता पाटील हिचं नाव लावणार असं त्याने घोषित केलं आहे. राज बब्बर यांच्याशी लग्न केल्यानंतर ३१व्या वर्षी स्मिता पाटील यांनी प्रतीक्षा जन्म दिला. पण गरोदरपणात काही कॉम्पिकेश्न्स आल्यामुळे त्यांना मृत्यू झाला आणि प्रतीकची आपल्या आईशी भेटही झाली नाही. त्यांच्या मृत्यूनंतर राज आपल्या पहिल्या पत्नी नादिराकडे परत गेले आणि प्रतीकने आई गमवाल्यानंतर वडिल असूनही त्यांच्याशिवायच तो लहानाचा मोठा झाला. (Bollywood trending news)

आईच्या निधनानंतर आणि वडिल असूनही त्यांच्याशिवाय वाढलेल्या प्रतीकने अभिनयातून आपल्या आीचा वारसा जपण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आणि त्यानंतर आता त्याने कठोर पावलं उचलून प्रतीक स्मिता पाटील असं नाव लावलं आहे. याबद्दल त्याने स्पष्टीकरण देत म्हटलं की, “मला परिणामांची काळजी नाही. मला फक्त हीच गोष्ट महत्त्वाची आहे की जेव्हा मी ते नाव ऐकतो, तेव्हा मला कसं वाटतं? मला माझ्या आईशी, तिच्या नावाशी आणि तिच्या वारसाशी पूर्णपणे जोडून राहायचं आहे. मी माझ्या वडिलांसारखं नाही तर माझ्या आईसारखं बनण्याचा प्रयत्न करतोय.”
खरं तर स्मिता यांनी राज बब्बर यांच्याशी केलेला विवाह त्यांच्या आई-वडिलांना मान्य नव्हतंच. १९७४ सालापासून स्मिता यांनी अभिनयाची सुरुवात केली. दुदर्शनवर वार्ताहर म्हणून करिअरची केलेली सुरुवात त्यांना अभिनयापर्यंत घेऊन आली. १९८२ मध्ये ‘भीगी पलके’ या चित्रपटाच्या शूटिंगवेळी स्मिता आणि राज यांची ओळख झाली होती. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यानंतर राज यांनी आधी विवाहित असूनही स्मिता यांच्याशी लग्नगाठ बांधली.
===========================
हे देखील वाचा:Deepika Padukone : पॅरिस फॅशन वीकमध्ये दीपिकाचा जलवा!
===========================
स्मिता यांनी राज बब्बर यांच्या सोबत लग्नाचा घेतलेल निर्णय त्यांच्या आई-वडिलांना पटला नव्हता. स्मिता पाटील आणि राज बब्बर यांच्या लव्हस्टोरीचा उल्लेख लेखिका मैथिली राव यांनी त्यांच्या बायोग्राफीमध्ये केला असून त्यात त्यांनी लिहिलं आहे की, स्मिता यांची आई या दोघांच्या नात्याच्या विरोधात होती. त्यांचं असं म्हणणं होतं, की महिलांसाठी लढणारी स्मिता दुसऱ्याचं घर, दुसऱ्याचा संसार कसा मोडू शकते?

मात्र, स्मिता-राज यांचं लग्न झालं आणि प्रतीक्षा जन्म झाला. पण बाळंतपणानंतर १५ दिवसांनी वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी स्मिता पाटील यांनी जगाचा निरोप घेतला आणि भारतीय चित्रपटसृष्टीचं मोठठं नुकसान झालं. असंही म्हटलं जातं, की स्मिता पाटील यांना कायम असं वाटायचं, की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना एका नव्या नवरीप्रमाणे तयार केलं जावं. स्मिता यांनी त्यांचे मेकअप आर्टिस्ट दिपक सावंत यांना ही इच्छा बोलूनही दाखवली होती. दरम्यान, मेकअप आर्टिस्ट दिपक यांनी स्मितांच्या निधनानंतर आपलं दु:ख व्यक्त करत म्हटलं होतं की, “मला जराही कल्पना नव्हती, की मला असंही काही करावं लागेल”.
…कर्मशिअल चित्रपट करण्यासाठी शबाना ठरल्या कारणीभूत
थोडं स्मिता पाटील यांच्याबद्दल…स्मिता पाटील (Smita Patil) यांनी समांतर चित्रपटांमध्ये आपली पकड मजबूत केली होती. पण त्यावेळी समांतर चित्रपटांसोबत कर्मशिअल चित्रपटांचाही काळ आला होता. त्याचाच हा एक किस्सा. तर झालं असं की, स्मिता पाटील यांच्या मैत्रीणीने सई परांजपे (Sai Paranjape) यांनी त्यांच्याकडे ‘स्पर्श’ (Sparsh) चित्रपटाची स्क्रिप्ट वाचायला पाठवली. स्मिता पाटील यांनी त्या या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत असं समजून त्या कथेचं वाचन केलं.

अचानक त्यांनी बातम्यांमध्ये वाचलं की स्पर्श चित्रपटात शबाना आझमी (Shabana Azmi) प्रमुख भूमिका साकारणार आहेत. स्मिता यांना याचं इतकं वाईट वाटलं की त्यांच्या डोक्यात वेदना सुरु झाल्या. त्यांना या गोष्टीचं वाईट वाटलं होतं की त्यांच्या मैत्रिणीने सईने त्यांच्याऐवजी शबाना यांना ती भूमिका यासाठी दिली कारण त्यावेळी कर्मशिअल चित्रपटांमध्ये शबाना आझमी यांनी काम करावं अशी प्रचंड मागणी होती. आणि त्याचवेळी स्मिता यांनी ठरवलं की त्या देखील कर्मशिअल चित्रपटांमध्ये कामं करणार.