Thoda Tuza Ani Thoda Maza मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीने शेअर

Prathamesh Parab : “आता परत दगडू ही इमेज नकोय…”; असं का म्हणाला प्रथमेश?
अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) याचा ‘बालक-पालक’ या मराठी चित्रपटापासून सुरु झालेला प्रवास थेट ‘दृश्यम’पर्यंत पोहोचला आहे… मात्र, आजवर विविधांगी भूमिका जरी प्रथमेश परबने केल्या असल्या तरी प्रेक्षकांना टाईमपास चित्रपटातील दगडूचं कायमस्वरुपी लक्षात राहिला आहे.. खरं तर एखाद्या कलाकाराची ओळख त्यांच्या कॅरेक्टमुळे आजन्म प्रेक्षकांच्या लक्षात राहणं जितकं फायदेशीर आहे तितकाच त्याचा तोटा देखील आहे… यावरच प्रथमेशने त्याचं मत मांडलं असून आता परत दगडू ही इमेज नको आहे असं त्याने स्पष्टपणे म्हटलं आहे… नेमकं काय म्हणालाय प्रथमेश परब जाणून घेऊयात..

‘मुंबई टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत प्रथमेश परब म्हणाला, “मला एकाच धाटणीच्या भूमिका करायच्या नाहीत. मी ते टाळतोय. तसंच अडल्ट जोक करणारी भूमिकेलाही मी नाही म्हणतो. दगडू सारखं पात्रही मी थेट नाकारतो. कारण मला सतत तेच करायचं नाही. टाईमपास, टकाटक हे सिनेमे केल्यानंतर त्याच धाटणीच्या भूमिका ऑफर होऊ लागल्या. दगडू ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात आहे त्यामुळे आता मी ती ब्रेक करु शकत नाही. पण यापुढे सिनेमा निवडणं माझ्या हातात आहे.”
================================
=================================
पुढे प्रथमेश त्याच्या आदर्शांबद्दल बोलताना म्हणाला, “भरत जाधव, सिद्धार्थ जाधव हे माझे आदर्श आहेत. त्यांनी चौकटीत न राहता वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. मीही तोच प्रयत्न करत आहे. मधल्या काळात माझे आधीपेक्षा काही वेगळे सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. मी चोखंदळपणे सिनेमा निवडला नसता तर दर माझे सात-आठ चित्रपट प्रदर्शित झाले असते.”
================================
=================================
दरम्यान, नुकताच प्रथमेश याचा ‘गाडी नंबर १७६०’ चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये प्रियदर्शिनी इंदलकर, शुभंकर तावडे, प्रसाद खांडेकर यांची भूमिका आहे. तर, लवकरच प्रथमेश प्रमुख भूमिकेत पहिल्यांदाच हिंदी चित्रपटात झळकणार असून चित्रपटाचं नाव आहे ‘पॉडर’. याआधी तो ‘दृश्यम’, ‘दृश्यम २’ बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसला होता.. दरम्यान, लवकरच ‘दृश्यम ३’ (Drishyam 3) येणार असून यातही प्रथमेश परब दिसणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi