Lalit Prabhakar : एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट; ‘प्रेमाची

Prathamesh Parab : “मराठीतल्या सो कॉल्ड १,२ नंबर वाल्यांनी…”; प्रथमेशचं लक्ष्मण उतेकरांबद्दल मोठं विधान
‘बालक पालक’ ते ‘दृश्यम’ (Drishyam Movie) अशा मराठी ते हिंदी यशस्वी प्रवास करणारा अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) सध्या चांगलाच चर्चेत आहे.. लवकरच तो ‘गाडी नंबर १७६०’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाच्यादरम्यान सुरु असणाऱ्या प्रमोशनवेळी प्रथमेश याने चक्क ‘छावा’ (Chhaava) चित्रपट फेम दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांना ऑन कॅमेरा सॉरी म्हटलं आहे… इतकंच नाही तर मराठीतल्या सो कॉल्ड १,२ नंबर वाल्यांनी लक्ष्मण उतेकर यांना मराठी चित्रपटसृष्टीत उभंच केलं नाही अशी खंतही त्याने व्यक्त केली… चला तर जाणून घेऊयात नेमकं प्रथमेश लक्ष्मण उतेकर यांनी बाजू मांडल म्हणाला तरी काय…(Marathi Movies)

प्रथमेशने नुकतीच महाराष्ट्र टाइम्सला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तो म्हणाला की, “आमच्या सगळ्यांच्या वतीने मला त्यांना सॉरी म्हणायचं आहे. लक्ष्मण सर जेव्हा मराठीत आले होते तेव्हा त्यांना त्यांच्या प्रत्येक सिनेमासाठी झगडावं लागलं होतं. त्ंयाचं फ्रस्ट्रेशन मी बघितलं आहे. ते खूप वैतागले होते. मी कुठून आलोय, मी काय प्रकारचा सिनेमा केलाय…तुम्ही काय रेट देताय, कुठे विकताय….असं ते सारंख म्हणायचे. मी त्यांना भडकतानाही पाहिलंय . त्यांच्यासाठी मला भारी वाटलं की त्यांनी ‘छावा’ सिनेमा केला आणि त्यांनी सगळ्यांना दाखवून दिलं. खरंच त्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात इतका स्ट्रगल केलाय की त्यांच्याकडून ऐकण्यासारख्या फार गोष्टी आहेत..”(Entertainment News)

पुढे प्रथमेशने उतेकरांचा प्रवास सांगताना म्हटलं की, “मुंबईत असताना ते हातात डबा घेऊन असेच फिरायचे. फोटोग्राफरकडे ते असिस्टंट म्हणून कामाला होते. ते मराठीत सिनेमा बनवायला आले. मराठीत जे काय सो कॉल्ड १ नंबर, २ नंबर, ३ नंबर असणारी लोकं आहेत त्यांनी त्यांना उभं देखील केलं नाही. ही फार वाईट गोष्ट आहे. दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी सिनेमे केले तसे आपण का नाही करू शकत. तीच लोकं जाऊन मुंज्या बघतात…या दिग्दर्शकांचा मराठी इंडस्ट्री का वापर करून घेऊ शकत नाही. मला फार वाईट वाटतं की असे दिग्दर्शक आपण सोडतो आणि हिंदीला देतो. मग त्यांच्याकडे पण काही पर्याय राहत नाही. तुमच्याकडे बजेटच नसेल, तर मग कसे मोठे सिनेमे करणार?”.(Laxman Utekar struggle story)
================================
=================================
शेवटी ‘छावा’ चित्रपटाबदद्ल आपली खंत व्यक्त करत प्रथमेश म्हणाला, “आज ‘छावा’ मराठीत रिलीज झाला असता तर? आपल्याला किती फायदा झाला असता. ‘मुंज्या’ (Munjya Movie) तर मराठीत होऊच शकला असता. पण, बजेटमुळे झाला नाही. सरपोतदार यांनी ‘झोंबिवली’ (Zombivli Movie) नावाचा सिनेमा केला. पण तो लोकांनी पाहिला का? असे दिग्दर्शक आपल्या हातातून सुटतात. हे लेखक, दिग्दर्शक मराठीने जपले पाहिजेत. ही मोठी माणसं आहेत हे कळलं पाहिजे. साऊथवाले सगळ्यांना जपून ठेवतात. ओटीटीवर सगळे सिनेमे साऊथचे चाललेत. लक्ष्मण उतेकरांसाठी मला वाईट वाटतं. ते इतके मोठे दिग्दर्शक आहेत. त्यांच्यासाठी पैसे लावले पाहिजेत. आपल्याकडे बजेट आलं तर ही चांगली लोकं आपल्याकडे राहतील. याचा विचार केला पाहिजे”. आता प्रथमेश परब याने मराठी असूनही हिंदीत भारी कामं करणाऱ्या मराठीतल्या २ ग्रेट दिग्दर्शकांची बाजू घेत थेट मराठीलाच खडे बोल सुनावल्यामुळे याचा नेमका परिणाण कसा होणार हे पाहणं महत्वाचं असणारे..
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi