
Pratik Gandhi : ‘फुले’ चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख का बदलली?
स्त्री शिक्षणाची मुहुर्तवेढ रोवणारे सत्यशोधक महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘फुले’ (Phule) या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. परंतु, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली असून आता २५ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल असे सांगितले जात आहे. चित्रपटातील काही मुद्द्यामुळे वाद निर्माण झाला असून प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. (Entertainment trending news)

झी स्टुडिओज प्रस्तुत व अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ चित्रपटात अभिनेता प्रतीक गांधी (Pratik Gandhi) आणि अभिनेत्री पत्रलेखा राव (Patralekha) मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.काही दिवसांपूर्वी ‘फुले’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून वादाला तोंड फुटलं आहे. आनंद दवे यांनी आरोप करत असं म्हटलं आहे की म्हणाले, “‘फुले’ चित्रपटाच्या निर्मात्यांना ट्रेलरमधून वेगळं चित्र दाखवत पुन्हा जातीवाद करायचा आहे. चित्रपट वास्तवाला धरून नसेल तर हा चित्रपट योग्य नाही.” (Entertainment)

दरम्यान, रितेश कुडेचा यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर केलं. ‘बॉलीवूड हंगामा’ शी संवाद साधताना रितेश म्हणाले की, “‘फुले’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता २५ एप्रिलला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आम्ही आज सकाळीचं हा निर्णय घेतला.” दरम्यान, प्रदर्शनाच्या दोन दिवसाआधी ‘फुले’च्या (Phule) प्रदर्शनाची तारीख बदलल्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. (Bollywood news)
============
हे देखील वाचा: Ashok Saraf : “आजही लक्ष्यावर केलेला ‘तो’ चित्रपट मी नाकारल्या खंत…”
============
फुले चित्रपटावर आक्षेप घेत ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी आरोप करत असं म्हटलं की, या संघटनांनी चित्रपटावर जातीयतेला खतपाणी घालण्याचा आणि ब्राह्मण समाजाचं कलंकित चित्रण केलं आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर दवे यांनी चित्रपटावर टीका करताना असा दावा केला की, महात्मा फुलेंच्या समाजसुधारणांमध्ये योगदान देणाऱ्या ब्राह्मणांचा उल्लेख या चित्रपटात दुर्लक्षित करण्यात आला आहे. “फुलेंना ब्राह्मणांनी काही प्रमाणात विरोध केला असेलच, पण त्यांना समर्थनही केलं आहे. शाळा दिली, देणगी दिली, शिक्षक दिले, विद्यार्थी दिले. ते तुम्ही दाखवलं आहे की, नाही हा आमचा प्रश्न आहे. शिवाय, सेन्सॉर बोर्डानेही उडी घेत चित्रपटातल्या काही दृश्यांना कात्री लावायला सांगितली आहे. (Phule Movie)