Shubhvivah मालिकेत चिन्मय उद्गीरकरची एंट्री; आकाशच्या जीवासाठी भूमी करणार संघर्ष

Prateik Smita Patil : “आईच्या घरी वडिलांना लग्नाला बोलावणं…”
बॉलिवूडमधील सौंदर्य आणि अभिनयाची खाण असणाऱ्या स्मिता पाटील (Smita Patil) यांचा मुलगा प्रतीक (Prateik Patil) याने काही महिन्यापूर्वीच त्याची प्रेयसी प्रिया बॅनर्जीसोबत लग्नगाठ बांधली. पण प्रतीकने लग्नाला वडिल राज बब्बर (Raj Babbar) यांना बोलावलं नव्हतं. सिनेइंडस्ट्रीत या विषयावर बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. आता स्वत: प्रतीकनेच वडलांना लग्नाला का बोलावलं नाही याचं स्पष्टीकरण दिलं आहे. (Bollywood gossips)
प्रतीकने झूमला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “वडील राज बब्बर आणि भावंडांना लग्नाला न बोलावण्यामागे कोणतेही वैयक्तिक मतभेद किंवा भांडणं नव्हती”. प्रतीकने आई स्मिता पाटील यांच्या घरी लग्न केलं होतं. प्रतीकची आई (स्मिता पाटील) आणि त्याची सावत्र आई नादिरा बब्बर यांच्यातील संबंध फार बरे नव्हते. त्यामुळेच स्मिता पाटील यांच्या घरी वडील आणि त्यांच्या कुटुंबाला लग्नासाठी बोलावणं योग्य वाटत नसल्याचं प्रतीक म्हणाला. (Entertainment update)

प्रतीक म्हणाला की, “माझी आई आणि माझ्या वडिलांची पत्नी यांच्यात खूप वाद आणि समस्या होत्या. त्यावेळी बातम्यांमध्येही त्यांच्याबद्दल फार काही बोललं गेलं होतं. वडील आणि त्यांच्या कुटुंबासोबत मला एक वेगळा कौटुंबिक सोहळा करायचा होता. माझ्या आईचे वडिलांच्या कुटुंबासोबतचे संबंध तुटल्यावर आईच्या घरी त्यांना बोलावणं मला योग्य वाटत नव्हतं. त्यामुळे मला त्यावेळी जे योग्य वाटलं ते मी केलं.” (Bollywood news)
पुढे प्रतीक म्हणाला की, “मी त्यांचा द्वेष करतो असं नाही. माझी आई आणि तिच्या इच्छांचा सन्मान करणं माझ्यासाठी महत्वाचं होतं आणि आहे. माझे वडील आणि त्यांची पत्नी नादिरा बब्बर लग्नाच्या वेळी तिथे नव्हते, ते घरी येऊ शकले नाहीत याचं मला वाईट वाटलं. हे घर माझ्या आईने खरेदी केलं होतं. सिंगल पॅरेंट म्हणून तिला या घरात मला मोठं करायचं होतं. मी माफी मागतो, पण हा निर्णय मी आणि माझ्या पत्नीने मिळून घेतला होता.” (Bollywood tadaka)
================================
हे देखील वाचा: Prateik Smita Patil : आता बब्बर नाही ‘प्रतीक स्मिता पाटील’ म्हणायचं!
=================================
दरम्यान, प्रतीकने काही दिवसांपूर्वीच आपल्या नावातून राज बब्बर यांचं नाव आणि आडनाव हटवलं असून प्रतीक स्मिता पाटील असं नाव त्याने लावण्यास सुरुवात केली आहे. प्रतीकच्या चित्रपट कारकिर्दिबद्दल बोलायचं झालं तर त्याने आत्तापर्यंत ‘जाने तु या जाने ना’, ‘मुंबई डायरिज’, ‘दम मारो दम’, ‘आरक्षण’, ‘मुल्क’, ‘मित्रों, ‘छिछोरे’, ‘इंडिया लॉकडाऊन’,’सिकंदर’ अशा चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. (Prateik Smita Patil Movies)