Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Nilesh Sabale : “कलाकारांना फक्त ऐकूनच घ्यावं लागतं”; असं का

Bollywood : तीन मुस्लीम एकत्र आले आणि तयार झालं श्रीकृष्णाचं

Rekha-Amitabh Bachchan यांच्या नात्याचा ‘सिलसिला’!

‘चला हवा येऊ द्या’च्या निवेदनावर पहिल्यांदाच व्यक्त झाला Abhijeet Khandkekar;

Mr. India Movie : अमरीश पुरी नाही तर ‘हा’ अभिनेता

Prathamesh Parab : “आता परत दगडू ही इमेज नकोय…”; असं

Television Serial War: स्टार प्रवाह मालिका विरुद्ध झी मराठी मालिका; TRP च्या

Suchitra Bandekarच टीव्हीवर पुनरागमन; Milind Gavali सह ‘मनपसंद की शादी’ या हिंदी

Aata Hou De Dhingaana 4: मनोरंजनाच्या चौपट धमाल सफरीला सज्ज

Raj Thackeray : ‘त्या’ रात्री निलेश साबळेला राज ठाकरेंचे १७

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

प्रवास श्याम बेनेगल यांच्या कारकिर्दीचा…

 प्रवास श्याम बेनेगल यांच्या कारकिर्दीचा…
बात पुरानी बडी सुहानी

प्रवास श्याम बेनेगल यांच्या कारकिर्दीचा…

by दिलीप ठाकूर 10/11/2023

सत्तरच्या दशकात ‘सिनेमाच्या जगात’ एकाच वेळेस अनेक गोष्टी घडल्या. एक वेगळीच सरमिसळ होती ती. राजेश खन्नाची अबब म्हणावी अशी क्रेझ क्रेझ क्रेझ आणि अमिताभ बच्चनचे ‘सूडनायका’चे वादळ. ते असं काही घोंघावले की, चित्रपटाचा इतिहास बदलला. मल्टी स्टार कास्ट चित्रपटाचे पेव. ‘फक्त प्रौढांसाठी ‘ चित्रपटांचे युग ( पोस्टरवर पिक्चरच्या नावापेक्षा ‘ए’ मोठा…वादाचा) , ‘जय संतोषी मा’ ( रिलीज ३० मे १९७५) च्या खणखणीत यशाने पौराणिक चित्रपटांची जबरदस्त लाट आणि मृणाल सेन दिग्दर्शित ‘भुवन शोम ‘ (१९७०) पासून समांतर चित्रपटांची चळवळ सुरु. एक वेगळाच प्रवाह. त्यात अतिशय महत्वाचे ते दिग्दर्शक श्याम बेनेगल.(Shyam Benegal)

या नावातच त्या व्यक्तिमत्वाची ओळख, आदर, आदर्श, प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता आहे. त्यांच्या रुपेरी वाटचालीला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हा थोडक्यात फोकस. चित्रपट या माध्यमातून वास्तववादी जगाचे चित्रण करणाऱ्या दिग्दर्शकांतील सर्वोच्च स्थानावरील श्याम बेनेगल यांचे महत्व कोणीच नाकारु शकत नाही. त्यांच्या काही कलाकृतींवर थोडक्यात फोकस टाकायचा तर, शाम बेनेगल हे समाजातील वास्तव्य दाखवणारे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. श्याम बेनेगल यांना १९७६ मध्ये पद्मश्री आणि १९९१ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम कामगिरीसाठीच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. सात वेळा हिंदीतील सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही त्यांनी पटकावला आहे. २०१८ च्या राज्य चित्रपट महोत्सवात त्यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

श्याम बेनेगल यांचा जीवनपट सांगायचा तर जन्म १४ डिसेंबर १९३४ रोजी त्रिमुलघेरी येथे झाला , ते बारा वर्षांचे असताना, त्यांचे फोटोग्राफर वडील श्रीधर बी. बेनेगल यांनी त्यांना दिलेल्या कॅमेऱ्यावर त्यांनी पहिला चित्रपट बनवला. दृश्य माध्यमाशी त्यांची सर्वसाधारण ओळख ही अशी झाली असं म्हणता येईल. हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात एम. ए. केले .तेथे त्यांनी हैदराबाद फिल्म सोसायटीची स्थापना केली. दिग्दर्शक आणि अभिनेता गुरु दत्त यांच्या आजी आणि श्याम बेनेगल यांची आजी बहिणी होत्या.(Shyam Benegal)

नश्याम बेनेगल यांनी १९५९ मध्ये, त्यांनी लिंटास अॅडव्हर्टायझिंग, जाहिरात एजन्सीमध्ये कॉपी रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली , बेनेगल यांनी १९६२ मध्ये गुजराथी भाषेत आपला पहिला माहितीपट, घेर बेथा गंगा (दरवाजावर गंगा) बनवला. ते दृश्य माध्यमात एकेक पाऊल पुढे टाकत राहिले. यातून त्यांचा क्रियेटीव्ह स्वभावाचा प्रत्यय येतो. १९६३ मध्ये त्यांनी एएसपी (जाहिरात, विक्री आणि जाहिरात) नावाच्या दुसर्‍या जाहिरात एजन्सीमध्ये काही काळ जाहिरातपट बनवले. त्या काळात त्यांनी नऊशेहून अधिक प्रायोजित माहितीपट आणि जाहिरात चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

१९६६ ते १९७३ या काळात श्याम यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII), पुणे येथे शिकवले आणि संस्थेचे दोनदा अध्यक्ष म्हणून काम केले. तोपर्यंत त्यांनी माहितीपट बनवायला सुरुवात केली होती. त्याच्या सुरुवातीच्या माहितीपटांपैकी एक, अ चाइल्ड ऑफ द स्ट्रीट्स (१९६७), त्यांनी एकूण त्यांनी ७० हून अधिक माहितीपट आणि लघुपट बनवले आहेत. विशेषत: लघुपट निर्मितीत अनेक विषयांवर काम करण्याची संधी मिळते आणि एक प्रकारे कमी अवधीत बरेच काही सांगायचे असते..श्याम बेनेगल यांची चित्रपट दिग्दर्शक म्हणून पाळेमुळे अशी घट्ट होत गेली. ते महत्वाचे असते.त्यांना होमी जे. भाभा फेलोशिप (१९७०\७२) प्रदान केली गेली. ज्यामुळे त्यांना चिल्ड्रन्स टेलिव्हिजन वर्कशॉप, न्यूयॉर्क आणि नंतर बोस्टनच्या WGBH-TV मध्ये काम करण्याची परवानगी मिळाली. तेथून मुंबईत परतल्यानंतर, त्यांनी आपला पहिला चित्रपट “अंकुर” (द सीडलिंग) दिग्दर्शित केला. ते वर्ष १९७३.(Shyam Benegal)

यामुळे ते चित्रपटसृष्टीच्या प्रमुख प्रवाहात आले. आणि तसे होत असतानाच “चौकटीबाहेरचा विचार करणारा दिग्दर्शक ” अशी त्यांना ओळख प्राप्त झाली. या चित्रपटात तेलंगणामधील आर्थिक आणि लैंगिक शोषणाची कथा होती. ( तेव्हा तेलंगणा आंध्र प्रदेशमधील भाग होता.) शबाना आझमीचा हा पहिलाच चित्रपट ( म्हणजेच तिच्याही कारकिर्दीला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत.) या चित्रपटासाठी श्याम बेनेगल यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. शबानाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

श्याम बेनेगल यांची आता चित्रपट दिग्दर्शक म्हणून वाटचाल सुरु झाली..निशांत, मंथन, भूमिका अशा प्रत्येक चित्रपटासह त्यांच्या दिग्दर्शनातील विषयात वास्तवता आणि वेगळेपण दिसले. अशा चित्रपटांचा एक नवीन बुध्दिवादी चित्रपट रसिक निर्माण होत राहिला. मुद्रित माध्यमातून या चित्रपटांवर सखोल आणि वैचारिक लेखन होऊ लागले. अशा चित्रपटांच्या प्रदर्शनास दक्षिण मुंबईतील नेमकीच चित्रपटगृहे प्रामुख्याने उपलब्ध होत. उपनगरात कुठे तरी एकादे चित्रपटगृह मिळे. परन्तु याही परिस्थितीतून हे समांतर चित्रपट प्रदर्शित होत. श्याम बेनेगल यांनी आपल्या कलाकृतीतून पुणे येथील FTII ( चित्रपट आणि दूरदर्शन अभिनय प्रशिक्षण संस्था) आणि दिल्लीतील NSD ( नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा),मधील नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, स्मिता पाटील, शबाना आझमी, कुलभूषण खरबंदा आणि अमरीश पुरी अशा अनेक नवीन गुणी कलाकारांना संधी दिली. या कलाकारांनी आपल्या गुणवत्तेवर बरीच मोठी झेप घेतली.

‘भूमिका’ चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एकेकाळची अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या आयुष्यावर आधारित होता. मला आठवतय, तात्कालिक समिक्षकांनी ‘भूमिका ‘ चित्रपटाला फारशी पसंती दिली नव्हती. स्मिता पाटीलचा कसदार अभिनय हीच एक या चित्रपटाची जमेची बाजू आहे असेच त्यांचे म्हणणे होते. बेनेगलच्या यांच्या चित्रपटांवर फोकस टाकताना निशांत ( रात्रीचा शेवट ) (१९७५) वेगळाच. एका शिक्षकाच्या पत्नीचे चार जमीनदार अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार करतात; या अन्यायाविरुद्ध लढताना मदतीसाठी व्यथित पतीच्या विनवणीकडे अधिकारीवर्ग पध्दतशीरपणे दुर्लक्ष करतो यावर होता. हा चित्रपट अस्वस्थ करतो.

‘मंथन’ (१९७६) हा ग्रामीण भागातील तेव्हाच्या नवीन लघुउद्योगावर आधारित आहे आणि गुजरातच्या नवनवीन डेअरी उद्योगाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. प्रथमच, गुजरातमधील पाच लाखांहून अधिक ग्रामीण शेतकऱ्यांनी या चित्रपटासाठी प्रत्येकी दोन रुपयांचे योगदान दिले आणि अशा प्रकारे ते चित्रपटाचे निर्माते बनले. ‘मंथन’ चित्रपट पाहण्यासाठी शेतकरी मोठ्याच प्रमाणावर आले, त्याचा चित्रपटाच्या व्यावसायिक यशासाठी फायदा झाला. सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबई दूरदर्शनवर हा चित्रपट दाखवला गेला. चित्रपट माध्यमातील वेगवेगळे प्रयोग जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी अशा चित्रपटांचे विशेष खेळही आयोजित करण्यात येत असत. श्याम बेनेगल यांच्या काही कलाकृतींनी अशीही आपली एक वाटचाल केली. (Shyam Benegal)

“सुस्मन” (१९८७) (हातमाग सहकारी संस्था) या त्यांच्या चित्रपटाचा आम्हा समिक्षकांसाठी खेळ करण्यात आला आणि त्यात हातमाग क्षेत्रावर आधारित विषयाला दादही दिली. यानंतर श्याम बेनेगल दूरदर्शन माध्यमाकडे वळले, त्यांनी भारतीय रेल्वेसाठी “यात्रा” (१९८६), आणि भारतीय दूरदर्शनवरील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक, जवाहरलाल नेहरू यांच्या पुस्तकावर आधारित तब्बल त्रेपन्न भागांची दूरदर्शन मालिका “भारत एक खोज” (१९८८) या मालिकांची निर्मिती व दिग्दर्शन केले. भरपूर वाचन, संशोधन, भटकंती आणि अनेकांच्या भेटीगाठी यातून ते सतत नवीन विषयांवर सखोल काम करत राहिले आणि त्यातूनच कायमच त्यांच्या कामाचा दर्जा उंचावत राहिला. एक व्यक्ती असे बहुस्तरीय काम करते हे कायमच कौतुकाचे ठरले. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीमागचा त्यांचा प्रवास आणि दृष्टिकोन हा एका परिपक्व व्यक्तीमत्वाचा प्रत्यय देतो.
श्याम बेनेगल यांनी चित्रपटसृष्टीतील विविध घटकांवरही जबाबदारीने काम केले. १९८० ते १९८६ या काळात त्यांनी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) चे संचालक म्हणूनही काम केले. (Shyam Benegal)

अशातच त्यांना शशी कपूरच्या फिल्मवालाज या चित्रपट निर्मिती संस्थेच्या ” जुनून” (१९७८) आणि “कलयुग” (१९८१) या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची संधी मिळाली. शशी कपूर पारंपारिक मसालेदार मनोरंजक चित्रपटातून ‘टॅक्सी हीरो’ म्हणून मोठ्याच प्रमाणावर बिझी असला तरी त्याने चित्रपट निर्मितीत वेगळा ठसा उमटवला. श्याम बेनेगल यांना आपल्या दिग्दर्शनातील चित्रपट सादरीकरणात नेहमीच वैचारिक स्वातंत्र्य मिळालेच, पण फिल्मवालाज संस्थेत आर्थिक सपोर्ट सिस्टीमही मिळाला. श्याम बेनेगल यांनी आपले विविध विषयांवरील चित्रपट दिग्दर्शनात ‘ मंडी’ (1983) साकारला. वेश्याव्यवसाय विषयावरील तो होता, शबाना आझमी आणि स्मिता पाटील यांच्या अभिनयामुळे चित्रपट चर्चेत राहिला. श्याम बेनेगल यांचा त्रिकाल (१९८५) मानवी संबंधांवर आधारित होता. हैदराबाद येथील भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीत तो भारतीय पॅनोरमात निवडला गेला होता. मी तेथेच तो पाहिला.

श्याम बेनेगल १९८५ मध्ये चौदाव्या मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्युरीचे सदस्य होते. नव्वदच्या दशकात श्याम बेनेगल यांनी भारतीय मुस्लिम महिलांवर एक त्रयी तयार केली, ते चित्रपट होते, “मम्मो” (१९९४), “सरदारी बेगम” (१९९६) आणि “झुबैदा” (२००१) होते. ‘झुबैदा ‘मध्ये रेखा, मनोज वाजपेयी आणि करिश्मा कपूर यांची निवड त्यांनी केली. ‘कलयुग ‘नंतर ते पुन्हा रेखाला दिग्दर्शित करीत होते आणि वेगळ्या प्रवाहातील चित्रपटांना रेखाने कायमच सहकार्य केले आहे.( नखरे न दाखवता असे म्हणायचे का?) त्याच सुमारास करिश्मा कपूर इतर चित्रपटात बिझी असल्याने ती ‘झुबेदा ‘साठी अपेक्षित वेळ देऊ शकत नव्हती. त्यामुळेच चित्रपट निर्मितीवस्थेत रखडला. याच चित्रपटाच्या निमित्ताने ताडदेव येथील श्याम बेनेगल यांच्या कार्यालयात त्यांच्या मुलाखतीचा योग आला असता तेथील जगभरातील अनेक चित्रपटांची पुस्तके, काही पोस्टर्स, अनेक मान्यवर पुरस्कार, प्रमाणपत्र वगैरे पाहून मी काहीसा दबून गेलो. त्यांच्या या कार्यालयात त्यांच्या प्रगल्भ वैचारिक व्यक्तिमत्वाचा विलक्षण प्रभाव जाणवत होता. (Shyam Benegal)

=============

हे देखील वाचा : पद्मिनी कोल्हापुरेने लगावली ऋषी कपूरच्या कानशिलात

=============

श्याम बेनेगल यांनी एका मुलाखतीत म्हटले की, चित्रपट बनवण्यासाठी निधी मिळविण्यासाठी त्यांना विविध प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागतो. सुरज का सातवान घोडा, समर हरी-भारी: फर्टिलिटी , बाॅस द फाॅरगाॅटन हीरो नेताजी बोस हे त्यांच्या वाटचालीतील काही महत्वाचे टप्पे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे प्रगती पुस्तक अनेक गुणांनी भरलेले आहे. विविध सामाजिक विषयावरील चित्रपट आणि त्याच वेळेस चरित्रपट, कधी एकाद्या विषयाचा इतिहासाचा शोध तर कधी कथात्मक चित्रपटांच्या पलीकडे जाऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्याला स्कोप असलेला विषय.
श्याम बेनेगल चित्रपट संस्कृतीतील एक प्रतिष्ठित, विश्वासार्ह व्यक्तिमत्व. चित्रपट माध्यमातील विद्यापीठ. एक वैचारिक परंपरा. भारतीय चित्रपटसृष्टीतील एक वेगळा प्रवाह. समांतर अथवा वास्तववादी चित्रपट चळवळीतील एक महत्वाचा घटक. पन्नास वर्षाच्या रुपेरी प्रवासातील वैशिष्ट्यपूर्ण ठसा. भारतीय चित्रपटाला जगभरातील कान्स, बर्लिन अशा अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ओळख मिळवून देण्यात श्याम बेनेगल यांच्या अनेक कलाकृतींनी यश प्राप्त केले. ही एक विशेष उल्लेखनीय गोष्ट . त्यामुळेच जगभरातील अनेक चित्रपट रसिक, अभ्यासक, विश्लेषक यांच्यापर्यंत त्यांचे चित्रपट पोहचले. (Shyam Benegal)

हा सगळाच एक माहितीचा ट्रेलर ठरावा अशीच श्याम बेनेगल यांची चौफेर आणि व्यापक वाटचाल आहे. पूर्णपणे ‘सिनेमामय ‘ झालेले व्यक्तिमत्व. पण फिल्मी अजिबात नाही. तर कमालीचे बुध्दीवादी. चित्रपट माध्यम व व्यवसायाकडे गांभीर्याने पाह्यला हवे असे आदर्श व्यक्तिमत्व.

  • 3
    Share
    Facebook
  • 1
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 1
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Celebrity Entertainment Featured film director Indian film director and screenwriter Shyam Benegal
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.