
Preeti Zinta ने कार अपघातात गमावले होते पहिले प्रेम, अभिनेत्रीने सांगितली भावनिक गोष्ट म्हणाली, ‘आज ही आठवण आल्यावर रडते’…
Preeti Zinta बॉलिवूडची अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे. असे जरी असले तरीही बऱ्याच काळापासून ती मोठ्या पडद्यापासून दूर आहे, परंतु आयपीएल सामन्यांमध्येही ती तिच्या सौंदर्याची कारणास्तव ती नेहमी चर्चेत असते. नुकतेच प्रीति जिंटा सोशल मीडिया एक्स वर ‘आस्क मी एनीथिंग’ सत्र केले होते, ज्यामध्ये तिला विचारण्यात आले की जेव्हा ती ‘कल हो ना हो’ चा चित्रपट पाहते तेव्हा ती रडते का, तिने या प्रश्नावर दिलेले उत्तर वाचून तुम्ही ही भावूक व्हाल. (Preity Zinta Boyfriend Death)

मंगळवारी प्रीतीने तिच्या एक्स अकाउंटवर चाहत्यांबरोबर एक प्रश्नोत्तर सत्र ठेवले होते. या दरम्यान तिने पहलगाम आतंकवादी हल्ला पासून ऑपरेशन सिंदूर पर्यंत तिचा प्रतिसाद दिला. या दरम्यान एका चाहत्याने प्रीतीला शाहरुख खान यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘कल हो न हो’ बद्दल विचारले. चाहत्याने लिहिले की, “प्रीती झिंटा मॅडम, जेव्हा मी ‘कल हो न हो’ पाहतो, तेव्हा मी लहान मुलांसारखा रडतो. तुम्ही नैना कॅथरीन कपूरचे पात्र अगदी योग्यपणे साकारले आहे. तसेच मी एक धडा देखील शिकलो की प्रेम म्हणजे कधी कधी स्वतःला सोडून देणे असते. जेव्हा तुम्ही 20 वर्षांनंतर शूटिंगनंतर ‘कल हो न हो’ पाहता, तेव्हा तुम्ही आमच्या प्रमाणे रडता का?”

याच प्रश्नाचे उत्तर देताना, प्रीतीने तिच्या “पहिल्या प्रेमाला कार अपघातात गमावण्याबद्दल”सांगितले , अभिनेत्रीने सांगितले, “होय, जेव्हा मी हा सिनेमा पाहते तेव्हा मला रडू येते आणि जेव्हा आम्ही हे चित्रित करत होतो तेव्हा पण मी रडले! माझं पहिलं प्रेम एका कार अपघातात मरण पावले, म्हणून ही फिल्म नेहमीच विशिष्ट पद्धतीने मला हिट करते, सिनेमाच्या बहुतेक सिन्समध्ये सर्व कलाकार नैसर्गिकपणे रडले होते.. आणि अमनच्या मृत्यूच्या दृश्यात सर्वजण कॅमेराच्या समोर आणि मागे देखील रडत होते! (Preity Zinta Boyfriend Death)
===================================
हे देखील वाचा: Mahavatar Narsimha Movie: नृसिंह जयंतीनिमित्त ‘महावतार नरसिंह’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर; ‘पाच भाषणांमध्ये होणार प्रदर्शित !
===================================
या प्रशोत्तराच्या सत्रात प्रीती झिंटाने खुलासा केला की तिने अलीकडे शाकाहारी बनायला सुरुवात केले आहे. पण ती कधी कधी तिच्या प्रोटीनची आवश्यकतांना पूर्ण करण्यासाठी तिच्या आहारात अंडे देखील समाविष्ट करते. प्रितीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, प्रीती राजकुमार संतोषी यांच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या ‘लाहोर १९४७’ चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीमध्ये परत येण्यासाठी ती पूर्णपणे सज्ज आहे.