Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rashmika Mandanna & Vijay Devarkonda यांनी वेडिंग रिसेप्शनला ‘त्या’ कृतीने

Sanai Choughade Zee Marathi Serial: ‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेता राज

Varsha Usgaonkar यांची 47 लाखांची फसवणूक! दिग्दर्शक-बिल्डरविरोधात गुन्हा दाखल…

‘I am Looser’ म्हणत Rakhi Sawantने पूलमध्ये मारली उडी; राराच्या

अभिनेत्री Aruna Irani अमिताभ बच्चनची नायिका कशी बनली?

Bigg Boss Marathi 6 मध्ये कॅप्टन्सी टास्कदरम्यान मोठा थरार; संकेतच्या

Vicky Kaushal त्या चिमुकलीपुढे झाला नतमस्तक!

Ranabaali Movie : तेलुगु चित्रपटसृष्टीत अजय-अतुलच्या संगीताचा डंका!

Grahan नावाच्या चित्रपटात नूतनचे नायक सुभाष घई

Big Boss Marathi 6 : ‘मी शोमध्ये असेपर्यंत तुझ्यासोबत बोलणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Premachi Gosht Marathi Serial: नातेसंबंधांवर भाष्य करणारी ‘प्रेमाची गोष्ट’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !

 Premachi Gosht Marathi Serial: नातेसंबंधांवर भाष्य करणारी ‘प्रेमाची गोष्ट’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !
kalakruti-premachi-gosht-new-marathi-serial-will-hit-the-small-screens-soon-marathi-info/
टीव्ही वाले

Premachi Gosht Marathi Serial: नातेसंबंधांवर भाष्य करणारी ‘प्रेमाची गोष्ट’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !

by शुभांगी साळवे 30/07/2023

हल्ली वेगवेगळ्या विषयांवर आधारिक अनेक मालिका आपल्या भेटीला येत आहेत. अलीकडेच तेजश्री प्रधान आणि शुभांगी गोखले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची नवी मालिका स्टार प्रवाहवर सुरु होणार असल्याचं सांगितलं. ही नवी मालिका नेमकी कोणती? मालिकेची गोष्ट काय असेल? कोणते कलाकार असतील? याविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. ज्या मालिकेविषयी इतकं भरभरुन बोललं जातंय ती मचअवेटेड मालिका ४ सप्टेंबरपासून रात्री ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणि या मालिकेचं नाव आहे ‘प्रेमाची गोष्ट’. स्टार प्रवाहच्या प्रत्येक मालिकेतून नातेसंबंधांवर भाष्य केलं जातं. प्रेमाची गोष्ट ही मालिका देखिल नात्यांची गुंफण असेल. चिमुकल्या सईवरच्या प्रेमापोटी दोन विभिन्न स्वभावाचे मुक्ता आणि सागर कसे एकत्र येतात आणि त्यांच्यातलं प्रेम कसं बहरत जातं हे सांगणारी सुंदर, तरल कथा म्हणजे प्रेमाची गोष्ट.(Premachi Gosht Marathi Serial)

Premachi Gosht Marathi Serial
Premachi Gosht Marathi Serial

प्रेमाची गोष्ट या नव्या मालिकेत प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान मुक्ता गोखले ही भूमिका साकारणार असून अभिनेता राज हंचनाळे हा सागर कोळी च्या भूमिकेत दिसेल. यासोबतच शुभांगी गोखले, संजीवनी जाधव, अपूर्वा नेमळेकर, संजय शेजवळ, योगेश केळकर, उमेश घाडगे, सुप्रीत कदम आणि बाल कलाकार इरा पारवडे अशी दिग्गज कलाकारांची फौज मालिकेतून भेटीला येईल. राहुल लिंगायत या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. या नव्या मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘प्रेमाची गोष्ट या नावातच सगळं काही येतं.हळुवार, संवेदनशील आणि पुन्हा एकदा आजच्या पीढीची गोष्ट घेऊन स्टार प्रवाह वाहिनी रसिकांना दर्जेदार करमणूक देण्यास सज्ज आहे. दिग्गज कलाकार आणि सक्षम लेखन, दिग्दर्शन असलेली ही प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांना नक्की आवडेल.’

Premachi Gosht Marathi Serial
Premachi Gosht Marathi Serial

त्याबरोबरच मुक्ता गोखले या व्यक्तिरेखेविषयी सांगताना तेजश्री प्रधान म्हणाली, ‘स्टार प्रवाह वाहिनीसोबत जवळपास १३ वर्षांनी पुन्हा एकदा काम करताना अतिशय आनंद होतोय. घराघरातील गृहिणी समरसून मालिका पहात असतात. त्यामुळे एक कलाकार म्हणून कोणतंही पात्र साकारताना सामाजिक जबाबदारीचे भान राखण्याचा मी प्रयत्न करते. मुक्ता हे पात्रं प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. मुक्ता साकारतान माझ्यासमोर मुलगी, सून आणि आईच्या भूमिकेतला समंजसपणा जपण्याचं आव्हान असेल.’(Premachi Gosht Marathi Serial)

===========================

हे देखील वाचा: प्राजक्ता आणि वीरू या दोन्ही पैलवानांच्या आयुष्याची होणार नवी सुरूवात…

===========================

मुक्ताच्या आईची म्हणजेच माधवी गोखले ही भूमिका साकारणार आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले, ‘या भूमिकेविषयी सांगताना त्या म्हणाल्या  म्हणाल्या ‘स्टार प्रवाहसोबत खूप जुनं नातं आहे. अग्निहोत्र, अग्निहोत्र २ आणि आता प्रेमाची गोष्ट. मालिकेची टीम खूप उत्तम आहे. या मालिकेचं लेखन हे बलस्थान म्हणता येईल. माधवी या पात्राच्या निमित्ताने साधेपणातलं सौंदर्य जपायला मिळेल.’ ‘प्रेमाची गोष्ट’ ही नवी कोरी मालिका आपल्याला ४ सप्टेंबरपासून रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर पहायला मिळणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment Marathi Serial Premachi Gosht Marathi Serial raj hanchanale serial shubhangi gokhale new serial star pravah new serial tejashree pradhan serial
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.