
Prime Video-Maddock Films ने केली ८ मेगा चित्रपटांची डील!
थिएटर्सपेक्षा सध्या प्रेक्षकांचा कल ओटीटी प्लॅटफॉर्म्सकडे आणि त्यावर रिलीज होणाऱ्या जगभरातील कंटेन्टकडे आहे… आणि आता प्रेक्षकांची मागणी लक्षात घेऊनच आता प्राईम व्हिडिओ आणि मॅडॉक फिल्म्सने मोठा निर्णय घेतला आहे… येत्या वर्षात ८ मेगा चित्रपटांसाची मल्टी-ईयर डील त्यांनी केली असून भारतीय चित्रपटांचा ग्लोबल विस्तार करण्याचा निर्णय या दोन कंपन्यांनी घेतला आहे…

प्राईम व्हिडिओ आणि मॅडॉक फिल्म्स यांनी एक महत्त्वपूर्ण करार जाहीर केला आहे. या मल्टी-ईयर लाइसेंसिंग कोलॅबोरेशन अंतर्गत, मॅडॉक फिल्म्सच्या ८ बहुप्रतिक्षित चित्रपटांचे वर्ल्डवाइड-एक्सक्लुसिव्ह स्ट्रीमिंग हक्क आता प्राईम व्हिडिओकडे असणार आहेत. दरम्यान, या मेगा चित्रपटांमध्ये हॉरर-कॉमेडी, रोमॅंटिक फ्रँचायझी आणि थरारक चित्रपटांचा समावेश देखील असणार आहे…
================================
=================================
८ चित्रपटांच्या या मेगा डीलमध्ये ‘थामा’ (Thama Movie) आणि याच युनिव्हर्समधील आणखी दोन अनाउंस न झालेल्या टायटल्सचाही समावेश असणार आहे. याशिवाय ‘परम सुंदरी’, ‘शिद्दत २’, ‘बदलापूर २’, ‘इक्कीस’ अशा अजून चित्रपटांची यादी असून हे सर्व चित्रपट २०२५ ते २०२७ दरम्यान रिलीज होणार आहेत…(Maddock Films upcoming movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi