Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Priya Bapat : ‘पण या इगो चं’ गाण्यातून नात्यातील अहंकारावर केलं भाष्य!
अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत यांच्या आगामी बिन लग्नाची गोष्ट या चित्रपटाची पहिली झलक समोर आली होतीच.. आता या चित्रपटातील एक गाणं रिलीज झालं असून यातून नात्यातील अहंकारावर भाष्य करण्यात आलं आहे….नात्यांची नवी परिभाषा सांगणारा ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. यातील नवं गाणं ‘पण या इगो चं’ नुकतंच प्रदर्शित झालं असून, या गाण्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. नात्यातील प्रेम, आपुलकी, जिव्हाळा यासोबतच कधी कधी डोकावणारा अहंकार या गाण्यातून व्यक्त होत आहे.
दरम्यान, चित्रपटातील या गाण्याची खासियत म्हणजे प्रिया बापट आणि ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर यांनी हे गाणं एकत्र गायलं आहे. भारती आचरेकर यांनी पहिल्यांदाच चित्रपटासाठी गाणं गायलं असून त्यांच्या आवाजामुळे गाण्याला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. नात्यांमधील कोमल तरीही नाजूक सत्य अधोरेखित करणारं हे गाणं प्रत्येक प्रेक्षकाला आपल्या आयुष्यातील नात्यांची आठवण करून देणारं आहे.

गाण्यातून निवेदिता सराफ आणि प्रिया बापट यांच्या नात्यातील तणाव, संवादाऐवजी वाढलेलं मौन आणि त्यातून निर्माण झालेल्या अहंकाराचं प्रभावी चित्रण दिसतं. प्रत्येक नात्यात प्रेम असतं, परंतु कधी कधी त्यापेक्षा ‘इगो’ला जास्त जागा मिळते. नात्यात प्रेम मोठं की अहंकार? हा प्रश्न या गाण्यातून अधोरेखित होत असून या प्रवासाचा शेवट नेमका कुठे होईल, हे मात्र चित्रपट पाहिल्यावरच उलगडणार आहे.
============================
हे देखील वाचा : Janhvi Kapoor हिला ३ मुलं का हवी आहेत?; तिनेच सांगितलं कारण….
============================
गॉडगिफ्ट एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. कथा समीर कुलकर्णी यांची असून दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केलं आहे. प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ, गिरीश ओक, सुकन्या मोने आणि संजय मोने यांच्या दमदार अभिनयाने सजलेला हा चित्रपट नात्यांचा आरसा ठरणार आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi