
Priya-Umesh यांची ‘बिन लग्नाची गोष्ट’साठी निवड झाली तरी कशी?
जवळपास १० वर्षांनी प्रिया बापट आणि उमेश कामत ही मराठीतील गोड जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे… निमित्त आहे बिन लग्नाची गोष्ट हा चित्रपट…. या चित्रपटात निवेदिता सराफ आणि गिरीश ओक हे दिग्गज कलाकार देखील दिसणार आहेत… परंतु, या चित्रपटासाठी उमेश-प्रियाची निवड कशी झाली याचा खास किस्सा दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी सांगितला आहे… जाणून घेऊयात…

आदित्य इंगळे म्हणाले की, ”मी उमेश -प्रियाकडे एकदा जेवायला गेलो असताना, प्रियाची शिस्त, उमेशचा सहजपणा, गंमतीशीर स्वभाव बघून मला त्या दोघांपेक्षा त्यांच्यात माझी पात्रच दिसायला लागली. आशय आणि ऋतिका सारखेच ते वागत होते. ते इतके या पात्रांमध्ये फिट होत होते की त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय असूच शकत नाही, असं मला वाटलं म्हणून मी त्यांना या चित्रपटासाठी विचारलं. त्यांना कथा ऐकवली. प्रिया तर गंमतीनं म्हणाली सुद्धा ‘तू आधी मला बघितलं आणि मग हे पात्र लिहिलं ना?!’ खरं तर या व्यक्तिरेखा आधीच लिहिल्या होत्या आणि हे दोघं त्यात परफेक्ट बसले. आशय -ऋतिका आणि उमेश – प्रियाच्या वागण्यात इतकं साम्य होतं की, दुसरं कोणी मला दिसलंच नाही.”(Priya Bapat and Umesh Kamat)
================================
=================================
दरम्यान, १२ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात बरेच कलाकार दिसणार आहेत.. कौटुंबिक चित्रपटाला विनोदाची जोड देणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस येणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे… गॉडगिफ्ट एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित ‘बिन लग्नाची गोष्ट’ची कथा समीर कुलकर्णी यांची असून, दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केलं आहे.