Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Priya Bapat : ‘बिन लग्नाची गोष्ट’ मधील प्रेमगीत रिलीज;प्रिया-उमेशची अनोखी केमिस्ट्री दिसणार!
अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत जवळपास १० वर्षांनी पुन्हा एकदा मराठी चित्रपटात एकत्र झळकणार आहेत…आजच्या नाते संबंधावर भाष्य करणाऱ्या ‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटातील ‘मला तू, तुला मी’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून प्रेम आणि नात्यांची एक वेगळी, सजीव भावना यातून साकारली गेली आहे. कोणत्याही चौकटीत न अडकलेलं हे प्रेम मग ते कोणत्याही नात्याबद्दलचे असो. या गाण्याचे शब्द नात्यांमध्ये असलेल्या अबोल, तरीही ठाम भावनांना शब्दरूप देतात.

चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी या गाण्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं की, ”हे गाणं म्हणजे फक्त दोन पात्रांमधलं प्रेम नाही, तर एकमेकांना स्वीकारण्याची भावना आहे. ‘मला तू, तुला मी’ ही ओळ म्हणजे कोणतीही नात्याची बंधनं नसतानाही एकमेकांत असलेली दृढ भावना सांगणारी आहे.”(Marathi Movie 2025)
================================
हे देखील वाचा : उमेश कामत आणि प्रिया बापट यांची प्यारवाली लव्हस्टोरी
=================================
‘बिन लग्नाची गोष्ट’ १२ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गॉडगिफ्ट एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटात प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. कथा समीर कुलकर्णी यांची असून, दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केलं आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi