Lalit Prabhakar : एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट; ‘प्रेमाची

Priya Bapat-Umesh Kamat तब्बल १२ वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार!
मराठी चित्रपटसृष्टीतील पावरफुल कपल म्हणजे उमेश कामत आणि प्रिया बापट…२०१३ मध्ये ‘टाईम प्लीज’ (Time Please) या चित्रपटानंतर दोघांनी एकत्र चित्रपटात काम केलं नव्हतं… आता तब्बल १२ वर्षांनी दोघं पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत…‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटात पुन्हा एकदा उमेश आणि प्रिया आपल्या कॅमिस्ट्रीने प्रेक्षकांना भंडावून सोडणार आहेत… गेल्या काही वर्षांपासून दोघांचे चाहते त्यांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहाण्यासाठी उत्सुक होते आणि अखेर या चित्रपटातून त्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. (Marathi Movies)
सध्या रंगभूमीवर जर तर ची गोष्ट या नाटकात प्रिया आणि उमेश एकत्र काम करत आहेत… मात्र, चित्रपटात त्यांना एकत्र पाहण्याची प्रेक्षकांची इच्छा अखेर १२ वर्षांनी पुर्ण होणार आहे… दरम्यान, ‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केलं असून निर्मिती नितीन वैद्य यांची आहे…

दरम्यान, या आधी प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी ‘आणि काय हवं’, ‘भेट’ या सीरीज आणि चित्रपटात एकत्रित कामं केली आहेत… आणि आता गॉडगिफ्ट एंटरटेन्टमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित, तसेच तेजश्री अडिगे आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन प्रस्तुत, ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट येत्या १२ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi