Manoj Kumar : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘भारत’ काळाच्या पडद्याआड

प्रिया मराठे चा मॅाडर्न अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस….
‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ या मालिकेमधल्या नचिकेत, सई आणि अप्पा केतकर या तीन व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी त्यांच्या मनात कायमची जागा दिली. सई आणि नचिकेत यांच्या प्रेमामधली लपवाछपवी पहाताना रसिकांनाही मजा येतेय आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे मालिकेला मिळणारा चाहत्यांचा भरघोस प्रतिसाद. आता या मालिकेत एक नवीन व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे, ती म्हणजे नचिकेतची आई इरा देशपांडे. ती म्हणजे रसिकांची लाडकी अभिनेत्री प्रिया मराठे. (Priya Marathe) पुण्यात लहानाची मोठी झालेली इरा लग्न करून ऑस्ट्रेलियाला गेली आणि गेली २५ वर्ष ती तिकडेच राहतेय.
या नव्या भूमिकेबद्दल बोलताना प्रिया म्हणाली, “ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मालिकेत एक वेगळी भूमिका माझ्या वाट्याला आली आहे. मी या आधी कधीच NRI ची भूमिका निभावली नव्हती त्यामुळे मी खूप एन्जॉय करतेय आणि रसिकांना देखील माझी हि नवीन भूमिका बघायला नक्की आवडेल अशी मी आशा करते.”

प्रिया मराठेने ‘या सुखांनो या’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री मारली. यानंतर ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेत तिने काम केलं. ‘तू तिथे मी’ या मालिकेत तिने साकारलेली निगेटिव्ह भूमिका विशेष गाजली. याशिवाय ‘कसम से’ या मालिकेतून तिथे हिंदी मालिकांमध्ये एंट्री मारली. मात्र ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतील भूमिकेमुळे ती प्रत्येकाची लाडकी बनली.
आता नवीन भूमिकेच्या माध्यमातून ती रसिकांच्या भेटीला आली असल्यामुळे प्रियाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.
शब्दांकन- शामल भंडारे.