गाडीच्या टपावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाच्या आवाजातून सुचले हे गाणे!
देसी गर्लचा अलग अंदाज
लहानपणापासूनच प्रियांकाची फोटोजेनिक अशी ओळख आहे. फोटोला कशी पोज द्यायची हे कदाचित तिला लहानपणीच माहिती होतं.
प्रियांकाचा जन्म १८ जुलै १९८२ रोजी जमशेदपूर येथील सैन्य दलाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात झाला. तिचे सुरुवातीचे शिक्षण लखनऊ येथील लॉ मार्टीनियर्स या मुलींच्या शाळेत आणि बरेलीतील मारिया गोरेटी कॉलेजमध्ये झाले.
आपल्या फॅमिली आणि कुटुंबातील सदस्यांबद्दल प्रियांकाला विशेष आपुलकी आणि प्रेम आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रियांकाच्या प्रवासाची सुरुवात सनी देओलच्या ‘द हिरो – लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’ या चित्रपटाने झाली. पण, भारतीय चित्रपटसृष्टीतील तिचे पदार्पण २००२ साली आलेल्या ‘थामिजन’ या तमिळ चित्रपटाने झाले होते.
अभिनयाबरोबरच प्रियांका एक इंटरनॅशनल गायिका म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे. तिच्या चाहत्यांमध्ये तिची गाणी आणि तिचा अंदाज लोकप्रिय आहे.
रेड कार्पेटवरचा प्रियांकाचा अंदाज हा नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे. रेड कार्पेटवर नेहमीच प्रियांकाने स्वतःचा स्वतंत्र लुक मेंटेन केला आहे. ती तिची ओळख आहे.
हॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण केलेली भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला सलग दुसऱ्या वर्षी पीपल्स चॉईस पुरस्कारांमध्ये ‘फेव्हरीट ड्रमॅटिक ॲक्ट्रेस’चा पुरस्कार मिळाला आहे.
निकोलस जेरी जोनास एक अमेरिकन गायक, गीतकार, अभिनेता आणि रेकॉर्ड निर्माता आहे. याच्याशी २०१८ मध्ये प्रियांका विवाहबद्ध झाली.
नुकताच Amazon बरोबर प्रियांकाने करार केला असून या करारानुसार प्रियांका आपले विविध व्हिडीओज लोकांसमोर amazon च्या माध्यमातून घेऊन येणार आहे.