Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

Priyanka Chopra : आता १००० कोटींच्या बॉलिवूडपटात दिसणार देसी गर्ल!
‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) पुन्हा एकदा हिंदी चित्रपटसृष्टीत नव्या भूमिकेसह भेटायला येणार आहे. अनेक दिवसांपासून प्रियांका कमबॅक करणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, अखेर ४ वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रियांका बॉलिवूडमध्ये परत येत असून आजवरच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या बिग बजेट चित्रपटात ती विशेष भूमिकेत दिसणार आहे. एस.एस.राजामौली दिग्दर्शित ‘SSMB29’ या चित्रपटात प्रियांका महेश बाबू सोबत दिसणार आहे. (Priyanka Chopra-Jonas)
बिग बजेट चित्रपटांची खासियत असणारे राजामौली लवकरच महेश बाबू आणि प्रियांका यांच्यासोबत SSMB29 हा चित्रपट करणार असून या चित्रपटाचं बजेट १००० कोटी असल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वी राजामौली यांच्या ‘बाहुबली २’ किंवा ‘आरआरआर’ (RRR) चित्रपटांचं बजेट ५०० ते ५५० कोटी होतं. पण आता त्यांचा हा चित्रपट दुप्पट बजेटचा असेल असं सांगितलं जात असल्यामुळे नेमकं कथानक आणि मुळात सेट किंवा ग्राफिकली यात किती आधुनिक बदल असतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, नितेश तिवारींच्या ‘रामायण चित्रपटाच्या ८३५ कोटी बजेटलाही या चित्रपटाने मागे टाकले आहे. (Bollywood upcoming films)

पिंकविल्हाने दिलेल्या माहितीनुसार, SSMB29 चित्रपटाची कथा आफ्रिकन जंगल आणि त्यातील साहस यावर आधारित आहे असं सांगण्यात आलं आहे. येत्या एप्रिल २०२५ मध्ये चित्रपटाचं चित्रिकरण सुरु होईल अशी माहिती आहे. तसेच, चित्रपटातील प्रमुख अभिनेता महेश बाबू Mahesh Babu) यात ८ वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार असंही समोर येत आहे. महत्वाची बाब म्हणजे १००० कोटी बजेट असलेल्या या चित्रपटासाठी दिग्दर्शक राजामौली आणि अभिनेता महेश बाबू यांनी फी घेतली नाही आहे. त्यामुळे नक्कीच या बिग बजेट चित्रपटाची आता सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. (Priyanka Chopra upcoming movie)
===========================
हे देखील वाचा: Fashion Movie : ‘फॅशन’ चित्रपटाचा तो सीन पॅरिसमध्ये शूट होणार होता, पण….
===========================
प्रियांका चोप्रा २०२१ मध्ये नेटफ्लिक्सवर ‘द व्हाईट टायगर’ (The White Tiger) या चित्रपटात शेवटची दिसली होती. यात तिने राजकुमार रावसोबत काम केलं होतं. आणि त्यानंतर प्रियांकाने आपला मोर्चा हॉलिवूडकडे वळवून तिथेही अनेक माईलस्टोन आपल्या नावावर नोंदवले आहेत. त्यामुळे ४ वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय चित्रपटसृष्टीत प्रियांकाचे पुनरागमन नक्कीच भारावणारं असेल. (Entertainment news)