
मनी हाईस्टच्या पाचव्या सीझनमध्ये प्रोफेसरचा मृत्यू..??
नेट फ्लिक्सवर मनी हाइस्ट हा शो सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. चार सिझननंतर आता याच्या पुढील सिझनची सर्वांना प्रतिक्षा आहे.
मनी हाईस्टच्या पाचव्या सीझनमध्ये प्रोफेसरचा मृत्यू होऊ शकतो, अभिनेता अल्वारो मोर्तने स्वतः असाच संकेत दिला आहे. त्याचबरोबर मनी हाईस्टचा फक्त पाचवा नाही तर सहावा सीझन देखील येणार आहे. मारका या स्पॅनिश वेबसाईट नुसार, पाचव्या आणि सहाव्या सीझन साठी नेटफ्लिक्सनी हिरवा कंदील दाखवला आहे. पण या बातमीला अजून नेटफ्लिक्सने अधिकृत दुजोरा दिलेला नाही. पाचव्या सीझनमध्ये काय असेल हे अजून स्पष्ट झाले नसले तरीही या मालिकेत प्रोफेसरचं काम करणारा अभिनेता अल्वारो मोर्तने, त्याचा पुढच्या सीझन मध्ये मृत्यू शकतो असा अंदाज वर्तवला आहे.
पाचवा सीझन प्रोफेसरसाठी शेवटचा सीझन असेल का?
बर्लिन, मॉस्को, नैरोबी नंतर आता प्रोफेसर या पात्राचा मृत्य होऊ शकतो. एक्सप्रेस यू के नुसार मोर्तं म्हणाले की, “मला कल्पना आहे ही कमेंट नंतर कदाचित माझी लोकप्रियता कमी होईल. प्रोफेसर खूपचं विचित्र माणूस होता, एकदम एकलकोंडा. बँड सोबत जे घडलं किंवा किंवा तो प्रेमात पडणं हा त्याच्या आयुष्यातला खूप छोटा भाग होता. पण आपण जर या पात्राच्या अंताविषयी बोलत असू, तर मला त्याला पुन्हा त्या एकटेपणात गेलेलं बघायला आवडेल. त्या एकाकी आयुष्यात ज्याची त्याला सवय आहे, ज्याच्यात तो जास्त कंफर्टेबल आहे.”
आता प्रत्यक्षात काय होईल हे आपल्याला पुढील सिझनमध्येच कळेल