‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
Project-K Teaser: ‘हे’ आहे प्रभासच्या सिनेमाच नवे नाव; धमाकेदार टीजर ही आला समोर
प्रभास आणि दीपिका पदुकोण यांचा ‘प्रोजेक्ट के’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील दीपिकाचा फर्स्ट लुक समोर आला होता. अखेर या सिनेमाची पहिली झलक टीझरच्या रुपात प्रेक्षकांसमोर दाखल झाली आहे. प्रभास आणि दीपिका या दोघांची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार असून चाहत्यांना नक्कीच याची खूप उत्सुकता लागून राहिली आहे. त्याचबरोबर दीपिका आणि अमिताभ बच्चन हे दोघे ही या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले आहेत, या आधी हे दोघे आपल्याला ‘पीकू’ या सिनेमामध्ये एकत्र पहायला मिळाले होते. सॅन डिएगोमध्ये सुरू असलेल्या कॉमिक-कॉन इव्हेंटमध्ये प्रोजेक्ट के या चित्रपटाचे खरे नाव आणि टीझर प्रदर्शित झाल्याने अनेक महत्त्वपूर्ण माहिती आता समोर आली आहे.(Project-K Teaser)
‘प्रोजेक्ट के’ या साय-फाय अॅक्शन चित्रपटाला आता’कल्कि 2898 एडी’ असे नाव देण्यात आले आहे. चित्रपटाची पहिली झलक पहिल्यांदा २० जुलैला अमेरिकेत आणि आता २१ जुलैच्या सकाळी भारतात दाखवण्यात आली. यूट्यूबवर हा टीजर रिलीज होताच अवघ्या टीझर 6 तासात 16 लाख लोकांनी तो पाहिला आहे. निर्मात्यांनी सुरुवातीला त्याचे अनेक पोस्टर्स आणि दीपिकाचा फर्स्ट लूक रिलीज केला होता. ज्यावर खुप अशी चर्चा काही झाली नाही मात्र आता टीझर रिलीज करून चित्रपटाची कथा अखेर समोर आली आहे.‘कल्कि 2898 एडी’ या चित्रपटाची पहिली झलक पाहून प्रेक्षकांना यापूर्वी कधीही न पाहिलेला अनुभव जाणवेल. यात दीपिका एका योद्ध्यासारखी लढत आहे, तर वाईटाविरुद्ध लढणारी प्रभासची व्यक्तिरेखा भगवान विष्णूचा दहावा अवतार कल्की पासून प्रेरित आहे.
या टीजर वर नजर टाकली तर त्यात नरसंहाराची कथा दाखवण्यात आलेली आहे . जगभरात सर्वत्र अंधाकार आहे, लोकांना कैद करण्यात आले आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत त्यांना उपाशी ठेवले जात आहे, पाणी ही लोकांसाठी उपलब्ध नाही. त्याचबरोबर एका मोठ्या खोलीत शिवलिंगही दिसते. पण त्याची कुठल्याही प्रकारची पूजा होत नाही. त्यानंतर कुणाच्या तरी हातात हनुमानजींची छोटीशी मूर्ती दिसते.आणि लोकांना देवाचे स्मरण होताच प्रभास रक्षकाच्या रूपात दिसतो. (Project-K Teaser)
=========================
=========================
अनेक राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेल्या नाग अश्विन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन सह या सिनेमाची कथाही त्यांनीच लिहिली आहे. वैजयंती मुव्हीजच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती . आणि हा चित्रपट 600 कोटी रुपयांच्या प्रचंड मोठ्या बजेटमध्ये बनला आहे, त्यामुळे हा आतापर्यंतचा सर्वात महागडा भारतीय चित्रपट ठरला आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनाबद्दल सांगायचे झाले तर पुढच्या वर्षी १२ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला हा सिनेमा येणार आहे. आणि एकाच वेळी अनेक भाषांमध्ये तो रिलीज केला जाणार आहे.