Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Kajol हिने ‘३ इडियट्स’ का नाकारला होता? १६ वर्षांनी केला

Karishma Kapoor ने अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप केल्यानंतर काही महिन्यांनीच….

Dilip Kumar यांनी ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हॉलिवूड चित्रपट नाकारलेला!

एकेकाळी ऑस्करमध्ये… आता बॉलीवूडमधून गायब ! कुठे आहेत Ashutosh Gowarikar

Airplane Crash : नाशिक-मुंबई प्लॅन क्रॅश; अभिनेत्याचा हात तुटला पण

Sushant Singh Rajput : अंतराळवीर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ताऱ्याची कथा!

Aamir Khan ३० वर्षांनंतर रजनीकांत यांच्या ‘या’ आगामी चित्रपटात दिसणार

Deepika Padukone : संदीप वांगा याच्या ‘स्पिरिट’मधून आता ‘या’ सुपरस्टारचा

Karishma Kapoor : बॉलिवूडमधला महागडा घटस्फोट ते अभिनेत्रीचा सौदा; मॅरेज

Ahemdabad Airplane Crash :विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू,

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

नाटककार पुलंच्या बहुरंगी आठवणी

 नाटककार पुलंच्या बहुरंगी आठवणी
नाट्यकला मिक्स मसाला

नाटककार पुलंच्या बहुरंगी आठवणी

by रश्मी वारंग 11/06/2020

नाटककार म्हणून‌ पुलंची अनेक नाटकं रंगभूमीवर गाजली. पण खुद्द: पुलंच्या अभिनयाने मराठी रंगभूमीला एकपात्री प्रयोगांतून जे काही देऊ केलं तेही तितकंच कमाल आहे. बटाट्याची चाळ, असा मी असामी हे पुलंचे एकपात्री प्रयोग रंगभूमीवर प्रचंड गाजले. एका व्यक्तीने रंगमंचावर इतकी सारी पात्र एकट्याने उभी करणं सोपं नव्हतं पण लहानपणापासूनचा अनुभव पुलंच्या कामी आला.
लहानपणी पुलंनी “बेबंदशाही” नाटकातील सर्व स्त्रीपात्र काढून एकट्याने प्रयोग केला होता. नरसोबाच्या वाडीला पुलंची सकाळी मुंज झाली.भटजींनी मुंज कशी लावली याचा लागलीच संध्याकाळी एकपात्री प्रयोग घरच्यांसमोर रंगला. तो इतका धमाल होता की,मुंज लावणारे भटजीही स्वत: हसत होते.
या सगळ्या अनुभवांचा निश्चितच पुलंना भविष्यातील एकपात्री प्रयोगात फायदा झाला. पुलंना ‘एकपात्री’ हा शब्द खटकायचा. त्यांच्यामते तो ‘बहुरुपी’ प्रयोग असतो.
हा प्रयोग कठीण ठरतो कारण रंगमंचावर जे काही घडणार ते सगळं त्या नटाला एकट्याच करावं लागतं.विविध पात्रं कशी वागतील,बोलतील हे ठरवावं लागतं. ‘बटाट्याची चाळ’ चा एकपात्री प्रयोग बसवत असताना साडेतीन तासाचं स्क्रीप्ट समोर आरसा ठेवून पुलंनी पाठ केलं होतं. त्यात अनेक पात्रं होती. त्या पात्रांच्या वेड्यावाकड्या हालचाली पुलं खोलीभर हिंडून करत. संध्याकाळी प्रयोग असला की त्या पूर्ण दिवसभरात पुलं कुणालाही भेटायचे नाही. संपूर्ण साडेतीन तासाचं स्क्रीप्ट पुलं अखंड म्हणून घेत. “असा मी असामी” च्या वेळी तर पुलंनी कामशेत गाठलं. तिथल्या माळावर जाऊन उघड्यावर असामीच्या तालमी झाल्या. स्क्रीप्ट व्यवस्थित असली की आत्मविश्वास वाढतो हा पुलंच्या नाट्यसादरीकरणाचा मूलमंत्र होता.
आजकालच्या पिढीला हे कदाचित खूपच आश्चर्यकारक वाटू शकतं पण पुलंची ही मेहनत आणि नाटकावरची निष्ठा खूप काही सांगून जाते.
बटाट्याची चाळ आणि असा मी असामी तुफान चालले असताना,आताच्या भाषेत फुल‌फॉर्मात असताना पुलंनी ते थांबवण्याचा घेतलेला धाडसी निर्णय तर‌ त्याहीपेक्षा कमाल! तीन साडे तीन तास सलग सादरीकरण करुन पुलं थकून जात आहेत हे त्यांच्या पत्नीच्या सुनीताबाईंच्या ध्यानात आल्यावर त्यांनी पुलंना त्याची व्यवस्थित कल्पना दिली. अभिनेता पुलं थकत गेले तर नाटककार,लेखक पुलंवर त्याचा परिणाम होणार आणि उत्तमोत्तम नाटकं, साहित्य याला वाचक ,रसिक मुकणार हे जाणून प्रचंड गर्दीत आणि आर्थिक फायद्यात चाललेले हे एकपात्री प्रयोग योग्यवेळी थांबवण्याचा सूज्ञ निर्णय पुलंनी घेतला. कलेशी तडजोड होता कामा नये आणि नेमकं कुठे थांबायचं ते कळणं किती जरुरी असतं हे पुलंसारख्या व्यक्तीमत्वाकडे पाहून कळतं. विशेष करुन कामाचा ताण सहन‌ न झाल्याने रंगमंचावरच कायमची एक्झीट घेणारे कलाकार पाहून तर हे अगदी अधोरेखित होतं.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Drama Entertainment Marathi Natak Natak
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.