Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

पुण्याची जिगरबाज जोडी आकाश आणि सुरज मोरे ठरले ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’चे महाविजेते

 पुण्याची जिगरबाज जोडी आकाश आणि सुरज मोरे ठरले ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’चे महाविजेते
Mi Honar Superstar Jodi No.1 Winner
टीव्ही वाले मिक्स मसाला

पुण्याची जिगरबाज जोडी आकाश आणि सुरज मोरे ठरले ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’चे महाविजेते

by Team KalakrutiMedia 08/07/2024

स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. पलख-पूर्वा, आकाश-सुरज, सिद्धेश-रुचिता आणि अपेक्षा-प्रतिक्षा यांच्यामध्ये ही महाअंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत कोथरुड पुणे येथील आकाश आणि सुरज मोरे या जिगरबाज जोडीने बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली. तर उपविजेते पदाचा मान सिद्धेश थोरात-रुचिता जामदार आणि अपेक्षा लोंढे-प्रतिक्षा लोंढे या दोन जोड्यांना विभागून देण्यात आला. तृतीय क्रमांक पटकावला पूर्वा साळेकर आणि पलक मोरे या जोडीने. महाअंतिम सोहळ्यातील विजेती जोडी आकाश आणि सुरज मोरे यांना पाच लाखांची रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं. तर उपविजेता जोडीला दोन लाख आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या जोडीला १ लाख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं.(Mi Honar Superstar Jodi No.1 Winner)

Mi Honar Superstar Jodi No.1 Winner
Mi Honar Superstar Jodi No.1 Winner

विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना आकाश आणि सुरज म्हणाले की, ‘आम्ही आजवर बऱ्याच स्पर्धांमध्ये भाग घेतला मात्र मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन या कार्यक्रमाने विजेतेपदाचा आनंद मिळवून दिला. आम्हाला टॅलेण्ट सिद्ध करण्यासाठी हक्काचा मंच दिल्याबद्द्ल स्टार प्रवाह वाहिनीचे खूप खूप आभार. हा सारा प्रवास स्वप्नवत आहे. या क्षणाची खूप वाट पाहिली होती. महाअंतिम सोहळ्यात सामील होण्यासाठी आम्ही बरीच मेहनत घेतली होती. इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे खूप आनंद होत आहे. या मंचाने अंकुश चौधरी, फुलवा खामकर आणि वैभव घुगे गुरुच्या रुपात दिले. या गुरुंकडून खूप काही शिकायला मिळालं.’

Mi Honar Superstar Jodi No.1 Winner

आकाश आणि सुरज दोघेही सख्खे भाऊ. लहानपणापासूनच दोघांनाही नृत्याची आवड होती. घरची परिस्थिती अत्यंत हालाखिची होती. मात्र तरीही दोघांची नृत्याची आवड लक्षात घेऊन त्यांच्या आईने त्यांना नृत्याचं प्रशिक्षण देण्याचं ठरवलं. बरीच आव्हानं समोर होती. अनेक अडचणींचा सामना करत आकाश आणि सुरजने आपली नृत्याची आवड जोपासली. अनेक छोट्या मोठ्या स्पर्धांमधून भाग घेत घेत आकाश-सुरजला मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन कार्यक्रमाविषयी कळलं आणि त्यांनी ऑडिशनसाठी थेट मुंबई गाठली. ऑडिशन ते विजेता हा त्यांचा प्रवास खरोखर थक्क करणारा आहे.(Mi Honar Superstar Jodi No.1 Winner)

================================

हे देखील वाचा: ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’चं तिसरं पर्व लवकरच सुरु होणार

================================

आकाश आणि सुरजचं यश पाहून त्यांच्या आईचे डोळे पाणावले होते. हे घवघवीत यश आकाश आणि सुरजचा पुढील प्रवास अधिक तेजोमय करेल हे नक्की. आकाश आणि सुरज जरी या पर्वाची विजेती जोडी असली तरी या स्पर्धेतील सर्वच जोड्यांनी या पर्वात आपली चमकदार कामगिरी दाखवली आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Aakash And Suraj More Entertainment mi honar superstar Mi Honar Superstar Jodi No. Mi Honar Superstar Jodi No.1 Winner Star Pravah
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.