Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

Pushkar Jog : “मी गुंड असतो तर…”; सिकंदरमुळे पुष्कर जोगचा संताप
मराठी चित्रपट गेल्या काही काळापासून विविध विषय प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत… सामाजिक विषयांवर आधारित चित्रपट मराठीत फार पूर्वीपासून येत आहेतच पण त्यासोबतच आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर मराठीत करावा याचं हेतुने निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात पुष्कर जोग (Pushkar Jog) आला होता… मराठीत अनेक नवे प्रयोग त्याने केले. आजवर हिंदीच्याही कोणत्या चित्रपटाचं ज्या परदेशातील लोकशनवर शूट झालं नव्हतं तिथे पुष्करने मराठी. चित्रपटाचं शुटींग केलं होतं.. पण आता त्याच्या हार्धिक शुभेच्छा या चित्रपटाला सलमान खानच्या (Salman Khan) ‘सिकंदर’ चित्रपटामुळे धक्का लागला असून त्यावरुन पुष्करचा संताप झाला आहे…(Marathi films)

मुळात हिंदी चित्रपट रिलीज झाले की त्याचा पटकथा मराठी चित्रपटांना बसतोच… इतकंच नाही तर प्राईम शो देखील मराठीकडून काढून हिंदीला दिले जातात… २१ मार्च २०२५ ला प्रदर्शित झालेल्या हार्दिक शुभेच्छा या चित्रपटाचे शो सिकंदरमुळे हटवण्यात आले आहेत… पुष्करने (Pushkar Jog) संतापून सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे.. त्यात लिहिले आहे की, ‘सिकंदर’सारखा चित्रपट आला की, आमची दुसऱ्या आठवड्यात चाललेली फिल्म काढायची. छान. खरं तर मी गुंड असतो, तर बरं झालं असतं. निदान राग काढता आला असता.” पुढे पुष्कर जोगने लिहिले, “यासाठी कोणी कधीच काहीच करीत नाही, याचा अभिमान वाटतो.” अभिनेत्याने जोग बोलणार हा हॅशटॅगही वापरला असून, चित्रपटातील इतर कलाकारांना त्याने टॅग केले आहे. (Entertainment news)
===========================
हे देखील वाचा:Sharad Kelkar : ‘तान्हाजी’नंतर महाराज का साकारले नाही? शरद म्हणाले….
===========================
‘हार्दिक शुभेच्छा’ (Hardik Shubhechha) या चित्रपटात पुष्कर जोग, हेमल इंगळे, पूर्वी मुंदडा, विशाखा सुभेदार, अभिजीत चव्हाण, पृथ्वीक प्रताप अशी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शनही पुष्करने केलं आहे. सलमान खानच्या सिकंदर चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाने दोन दिवसांत ५५ कोटी कमावले आहेत…(Salman Khan Sikandar movie)