Big Budget Films : आगामी बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांची यादी!

Pyar ka mausam : तुम बिन जाऊं कहां के दुनिया में आके…
काही कलाकृती कधीच जुनी होत नाहीत किंबहुना काळानुरूप त्यातील नवनवीन सौंदर्य स्थळे जाणवल्याने त्या आणखीनच आवडू लागतात. संगीतकार आर डी बर्मन तथा पंचम यांच्या संगीताबाबत असेच म्हणावे लागेल. पंचम हयात होते तोवर रसिकांनी त्यांना फारसं कधी सिरीयसली घेतलंच नाही पण ते गेल्यावर त्यांच्या एकेका गाण्याची त्यात त्यांनी केलेल्या अभिनव प्रयोगाची चर्चा सोशल मिडीयाच्या माध्यमातून जगभर चालू असते. ‘ये साये हैं ये दुनिया हैं परछाईं ये साये हैं भरी भिड में खाली तनहाईंकी ये साये हैं’ पंचम यांनी स्वरबद्ध केलेलं आशाच हे ‘सितारा‘ सिनेमातील गीत. (Pyar ka mausam)

ऐंशीच्या दशकाततील हा सिनेमा आज कुणालाही आठवण्याची सुतराम शक्यता नाही. पण हे गाणं आजही काळजाला भिडतं. पंचम यांच्या अचाट सूर सामर्थ्याच प्रत्यंतर येतं. ऐंशीच्या दशकाच्या उत्तराधार्धात पंचम यांची अवस्था या गीताप्रमाणेच ‘गर्दीतील एकले पणाची’ होती. नवीन संगीतकाराच्या भाऊगर्दीत ते चौकटीच्या बाहेर पडले होते. पंचम यांना अभिजात पाश्चात्य नृत्य संगीताची मोठी गोडी होती.(Pyar ka mausam)
साठच्या दशकाच्या अखेरीस त्यांचा एक सिनेमा आला होता नासिर हुसैन यांचा ’प्यार का मौसम’ (Pyar ka mausam) यातील ’तुम बिन जाऊं कहां’ या गाण्याची मोहिनी आजही कायम आहे. यात त्यांनी म.रफी आणि किशोर कुमार या दोघांच्या स्वरात हे गाणं ध्वनीमुद्रीत केलं. सिनेमात हे गाणं पीसेसमध्ये बर्याचदा येतं. पंचमने या करीता केलेली वाद्यरचना अफाट होती. Kishore Kumar यांचा स्वर भारत भूषणसाठी वापरला.
किशोर कुमार यांनी गायलेली पहिली व्हर्शन चित्रपटाच्या सुरुवातीला येते. जिथे भारत भूषण त्यांची पत्नी निरुपा रॉय आणि तरुण शशी कपूर यांनी भूमिका करणारा मुलगा फैसल खान यांच्यासाठी “तुम बिन जाऊ कहां” गातात. ही व्हर्शन बंगाली मूळ गाण्याच्या अगदी जवळची आहे. किशोर कुमार यांचा आवाज नीलगिरीच्या रमणीय वातावरणात भरतो. रफीच्या काही संस्मरणीय गाण्यांमुळे यश मिळवणारे भारत भूषण किशोर कुमार यांच्या आवाजात कदाचित पहिल्यांदाच गायले असावेत. किशोर स्वरात, पंचमने “अहाहा हा हा हा ओ ओ” हे योडेलिंग अफाट होते. या गाण्यात कमीत कमी ऑर्केस्ट्रेशन आहे. किशोर कुमार यांचा आवाज आपले लक्ष वेधून घेतो. (Pyar ka mausam)

तो काळ रफीचा होता. ‘आराधना’ अद्याप प्रदर्शित व्हायचा होता! त्यामुळे मुख्य नायकाकरीता म्हणजे शशी कपूरसाठी रफीचा आवाज होता. या गाण्यातील मेंडोलीनचा अतिशय सुंदर वापर करण्यात आला. हे मेंडोलीन मनोहारी सिंग यांनी वाजवले आहे. अंतर्यातील व्हायोलीनचे पीसेस मनात आजही ताजे आहेत.मजरूह सुलतान पुरी यांनी लिहिलेल्या या गीतातील भावना रसिकांना ओलावून गेल्या. यातील पहिला अंतरा पहा
देखो मुझे सार से कदम तक, सिरफ प्यार हूं में;
गले से लगालो के तुम्हारा बेकार हूँ मैं;
तुम क्या जानो के भटकत फिरा
किस किस गली तुमको चाह के…”
आपल्याकडील lost and found या फॉरम्युला करीता असली गाणी मोठा खेळ खेळून जातात. या सिनेमात ही या गाण्याने ही कामगिरी चोख बजावली आहे. या गाण्याचा दुसरा अंतरा देखील मजरूहने मस्त लिहिला आहे. (Bollywood updates)
अब है सनम हर मौसम प्यार के काबिल;
पडी जहाँ छों हमारी साज गयी मेहफिल;
मेहफिल क्या तनहाई में भी लगता है जी
तुमको चाह के, तुम बिन…”
===========
हे देखील वाचा : saudagar : अमिताभ-नूतनचा अप्रतिम सिनेमा
===========
वस्तुत: हे गाणं किशोर-पंचमच्या ’एक दिन पाखे उरे जे आकाशे’ या बंगाली गीताच्या चालीवर बेतलं होतं. रफी आणि किशोर या दोघांनी अतिशय अप्रतिम गायलं. रफींचं व्हर्शन जरा जास्त लोकप्रिय ठरलं कारण ते नायकावर चित्रीत होतं. किशोरच्या व्हर्शनमधील ओपनिंग सुरावटीची कल्पना पंचमचीच होती. या गाण्याने सिनेमाच्या कथानकाला पुढे नेण्याचं मोठं काम तर केलंच आहे शिवाय त्यातील साकार झालेल्या भावनांनी व्यक्तीरेखांमधील नाते संबंध दृढ व्हायला मदत मिळाली. नासिरच्या पुढच्या दोन सिनेमात यादोंकी बारात (टायटल सॉंग) आणि हम किसीसे कम नही (क्या हुआ तेरा वादा) अशाच प्रकारचे मध्यवर्ती गीत टाकून सिनेमाच्या यशाचा पाया घट्ट केला. त्या अर्थाने हे गाणे ऐतिहासिकच म्हणावे लागेल! (Pyar ka mausam)