Nawazuddin Siddiqui : “बॉलिवूडपेक्षा मराठी उत्तम चित्रपट बनतात!”

R Madhvan : “मी तामिळ असूनही मला मराठी…”; मराठी-हिंदी भाषा वादात अभिनेता काय म्हणाला?
सध्या महाराष्ट्रात मराठी-हिंदी भाषेवरुन वाद सुरु आहे… सामान्य माणसांसह आता बॉलिवूड कलाकारांनी देखील मराठी-हिंदी भाषेवर आपली मतं देण्यास सुरुवात केली आहे… आता या मुद्द्यामध्ये अभिनेता आर माधवन (R Madhvan) सहभागी झाला असून मी तामिळ असूनही मला कधीच भाषेचा अडसर आला नाही अशी प्रतिक्रिया माधवन याने दिली आहे… सध्या आप जैसा कोई या चित्रपटामुळे तो विषेष चर्चेत आहे…(Bollywood)

आर माधवन याला एका मुलाखतीत तुला कधी भाषेमुळे अडचण आली का? असं विचारल्यावर माधवन म्हणाला की, “नाही, मला भाषेमुळे कधीच कोणतीही अडचण आली नाही. मी तामिळ बोलतो, हिंदीही बोलतो. शिवाय, मी कोल्हापूरमध्ये शिक्षण घेतल्यामुळे मला उत्तम मराठी बोलता येतं… त्यामुळे मला भाषेमुळे कधी कोणत्या अडचणीचा सामना करावा लागला नाही… मग मला एखादी भाषा येत असो किंवा नसो”. दरम्यान, या प्रकरणावर काही दिवसांपूर्वी अजय देवगण, शिल्पा शेट्टी, सुनील शेट्टी यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या…(Marathi-Hindi Language Conflict)
================================
=================================
आर माधवन याच्या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, आजही २३ वर्षांपूर्वीचा ‘रेहना है तेरे दिल मे’ चित्रपटातील मॅडी प्रेक्षकांच्या लक्षात आहे… नुकताच तो आप जैसा कोई चित्रपटात झळकला असून लवकरच तो रणवीर सिंग याची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘धुरंधर’ चित्रपटातही दिसणार आहे…गेल्या काही वर्षात खरं तर आर माधवनच्या रोमॅंटिक भूमिका प्रेक्षक मिस करत असून येत्या काळात त्याने पुन्हा एकदा अशी भूमिका साकारावी अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi