Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘धुरंधर’नंतर Akshaye Khannaला नजर लागली? आणखी एका चित्रपटातून झाला पत्ता कट

 ‘धुरंधर’नंतर Akshaye Khannaला नजर लागली? आणखी एका चित्रपटातून झाला पत्ता कट
मिक्स मसाला

‘धुरंधर’नंतर Akshaye Khannaला नजर लागली? आणखी एका चित्रपटातून झाला पत्ता कट

by रसिका शिंदे-पॉल 20/01/2026

२०२५ हे वर्ष अक्षय खन्नाने गाजवलं. लक्ष्मण उतेकरांच्या ‘छावा’ (Chhaava) चित्रपटातील औरंगजेबाच्या भूमिकेने त्याने सुरुवात करत आदित्य धर यांच्या ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपटातील रेहमान डकैत या भूमिकेने २०२५ वर्षाचा शेवट केला. यानंतर आता तो ‘दृश्यम ३’ (Drishyam 3) चित्रपटाचा भाग असणार होता, पण काही कारणामुळे त्याचा पत्ता यातून कट झाला. आता या चित्रपटापाठोपाठ आणखी एका चित्रपटातून त्याची दांडी गुल झाल्याची माहिती समोर येत आहे. (Akshaye Khanna)

खरं तर, अक्षय खन्नाने साकारलेल्या दोन्ही खलनायकी भूमिका साकारल्या आणि दोन्ही पात्रांमध्ये नाविण्य त्याने दिलं. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा टप्पा पार करणाऱ्या या चित्रपटानंतर खरं तर, अक्षयच्या मागे चित्रपटांची रांग लागेल असं वाटलं होतं. पण जरा उलटच घडलं आहे. त्याच्या हातून एकामागून एक चित्रपट निसटत चालले आहेत. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, ‘रेस ४’ (Race 4) सारख्या मोठ्या सिनेमातून पत्ता कट करण्यात आला आहे. (Entertainment News)

निर्माते रमेश तौराणी यांनी अक्षय खन्ना ‘रेस ४’ मध्ये दिसणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. बॉलिवूडमधल्या गाजलेल्या काही चित्रपटांच्या फ्रेंचायझीमध्ये रेस ही लोकप्रिय फ्रेंचायझी आहे. २००८ मध्ये आलेल्या रेस चित्रपटात सैफ अली खान, अनिल कपूर आणि अक्षय खन्ना प्रमुख भूमिकेत होते. त्यामुळे चौथ्या भागात पुन्हा सैफ आणि अक्षय एकमेकांना भिडणार असं वाटलं होतं. पण आता अक्षय ‘रेस ४’ चा भाग नसल्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. (Bollywoood)

निर्माता रमेश तौराणी यांनी अक्षय खन्ना परत दिसण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “नाही, आम्ही अक्षयशी संपर्क साधला नाही. त्यासाठी काहीच वाव नव्हता.” कथानकावर पुन्हा काम करण्याचा आणि त्याला परत आणण्याचा विचार केला आहे का असे विचारले असता, निर्माते म्हणाले, “त्याला परत आणण्याचा कोणताही विचार केलेला नाही. पहिल्या भागात त्याच्या पात्राचा अपघात होतो आणि त्याचा ट्रॅक तिथेच संपतो.”

 तसेच, रेस ४ मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) असतील का याबद्दल विचारलं असता, निर्मात्यांनी म्हटलं की, “कास्ट अद्याप फायनल झालेली नाही. पटकथेवर काम सुरू आहे.” गेल्या वर्षी, अफवा पसरल्या होत्या की हर्षवर्धन राणे आणि रकुल प्रीत सिंग चित्रपटासाठी चर्चेत आहेत. निर्मात्यांनी एक अधिकृत निवेदन देखील जारी केले होते की सध्या हे दोघे कलाकार आहेत. पण तौरानीच्या टीमने नंतर सर्वांना अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले. त्यामुळे आता ‘रेस ४’ मध्ये नेमकी कोणते कलाकार असणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

================================

हे देखील वाचा : अमीषा पटेलने Akshaye Khanna सोबत डेब्यू का नाकारला होता?

================================

दरम्यान, ‘रेस’ चित्रपटात सैफ अली खान, बिपाशा बसू, अक्षय खन्ना, कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि अनिल कपूर यांनी भूमिका केल्या होत्या. या चित्रपटाने भारतात ६० कोटींच्या पुढे तर जगभरात १०३ कोटींच्या पुढे कमाई केली होती. त्यानंतर, २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेस २’ मध्ये सैफ अली खान, अनिल कपूर, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, जॅकलिन फर्नांडिस आणि अमिषा पटेल यांच्या केल्या होत्या. या चित्रपटाने भारतात १०० कोटींचा टप्पा पार केला होता आणि जगभरात १६२ कोटी कमावले होते. यानंतर आलेल्या रेस ३ मध्ये सलमान खानने (Salman Khan) सैफ अली खान याची जागा घेतली होती. त्याच्यासोबत बॉबी देओल, साकिब सलीम आणि डेझी शाह झळकले होते. या चित्रपटाने भारतात १६० कोटी आणि जगभरात ३०० कोटी कमावले होते.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: aaditya dhar Akshaye Khanna Celebrity News Chhaava dhurandhar drishyam 3 Entertainment Laxman Utekar race 4
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.