Aatali Batami Phutli Trailer: धमाल कॉमेडी आणि थराराने नटलेल्या सिनेमाचा ट्रेलर

Radhika Apte : ‘OTT’ची खरी क्वीन!
राधिका आपटे (Radhika Apte)… साउथपासून हिंदी ते इंग्लिश चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री ! आज राधिकाचा वाढदिवस… राधिका आपटे मुळची पुण्याची. तिच्या वडिलांचे नाव डॉ. चारुदत्त आपटे असून ते पुण्यातील प्रसिद्ध न्यूरो सृजनांपैकी एक. अभिनयातच करिअर करण्याचा खास प्लॅम कधी राधिकाचा नव्हता असला तरी आज ती खऱ्या अर्थाने चित्रपट आणि विशेषत: ओटीटीची क्वीन म्हणून ओळखली जाते. नेटफ्लिक्स हा राधिका आपटेचा गडच म्हणावा लागेल. कारण ‘लस्ट स्टोरीज’, ‘सिक्रेट गेम्स’ आणि ‘घुल’ पासून तिचा नेटफ्लिक्सवर दर्जेदार चित्रपट आणि सिरीज देण्याचा प्रवास आजही कायम आहे. प्रतिष्ठीत International Emmy अवार्ड्समध्ये नॉमिनेशन मिळवणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री आहे. तिचा पहिला चित्रपट ‘वाह! लाईफ हो तो ऐसी!’ हा फक्त मजेसाठी केलेला रोलच तिच्या मोठ्या प्रवासाची सुरुवात ठरला. (Entertainment News)

हिंदी- मराठीच नाही… तर बंगाली, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि इंग्लिश अशा अनेक भाषांमध्ये काम करून राधिकाने खऱ्या अर्थाने “ग्लोबल स्टार” ही ओळख मिळवली.त्याचबरोबर रंगभूमीवरील तिच्या अभिनयाने तिला अंतहीन सारख्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या बंगाली चित्रपटात मोठी संधी मिळवून दिली. एकदा एका मोठ्या हिंदी ब्लॉकबस्टरमधून केवळ जाड वाटते या कारणामुळे तिला काढून टाकले गेले, तरीही ती कधीच खचली नाही आणि OTT ची खरी क्वीन ठरली. त्याचबरोबर तिने ‘पार्च्ड’, ‘फोबिया’, ‘अंधाधुन’ या नेटफ्लिक्सवरील अनेक प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांना खिळवून ठेवले. फिल्म कंपॅनियनने फोबिया मधील राधिकाचा अभिनय पाहून ‘दशकातील १०० सर्वोत्तम कामगिरी’ पैकी एक म्हणून मान्यता दिली. (Radhika Apte movies)

नाटकांपासून सुरू झालेला प्रवास राधिकाला दिग्दर्शनापर्यंत घेऊन गेला. २०२० मध्ये तिने ‘द स्लीपवॉकर्स’ या लघुपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केलं आणि तिने आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्याचबरोबर राधिकाने अभिनय क्षेत्रातील लैंगिक छळाविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवला आणि #MeToo चळवळीतही सक्रियपणे सहभागी होऊन स्पष्ट केले की, इंडस्ट्रीत मोठी व्यक्ती पुढे आली तरच खरा बदल शक्य होईल.
====================================
हे देखील वाचा : बोल्ड आणि बिनधास्त राधिका आपटे
====================================
Rediff.com च्या ‘सर्वोत्तम बॉलीवूड अभिनेत्री’ या यादीत राधिकाने २०११ मध्ये तिसरे, २०१५ मध्ये दुसरे आणि २०२२ मध्ये सातवे स्थान पटकावले. २०१२ मध्ये तिने लंडनमधील संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केले. अभिनय, दिग्दर्शन, OTT अशा सर्व क्षेत्रांतून राधिकाने आपली स्वतंत्र आणि प्रभावी ओळख निर्माण केली आहे. अशा ह्या बहुगुणी अभिनेत्रीला ‘कलाकृती मीडिया’कडून वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi