Rahul Mahajan Divorce: राहुल महाजन तिसऱ्यांदा घेणार डिवोर्स? मॉडेल नताल्या इलीनाशी ही नाही जुळले सूत
सिने इंडस्ट्रीत लग्न , डिवोर्स , एक्स्ट्रा मैरिटल अफेयर या गोष्टी काही नव्या नाहीत खास करून आता बॉलीवुड मध्ये हल्ली सतत अशा न्यूज ऐकायला मिळत आहेत.फरदीन खान लग्नाच्या तब्बल १८ वर्षानंतर डिवोर्स घेणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच आता आता राहुल महाजन ही त्याच्या घटस्फोटामुळे चर्चेतआला आहे. अनेक रिअॅलिटी शोजचा स्पर्धक असलेल्या राहुल महाजनने त्याची तिसरी पत्नी नताल्या इलिनासोबत घटस्फोट घेतल्याच्या बातम्या आता सोशल मिडीयावर तूफान व्हायरल होत आहेत. राहुलने चार वर्षांपूर्वी कझाकस्तानची मॉडेल नताल्या इलिनासोबत लग्न केले होते, त्यानंतर काही आपापसातल्या अडचणींमुळे या जोडप्याने गेल्या वर्षी घटस्फोटासाठी अर्ज केला होता अशी माहिती आता समोर आली असून राहुल महाजन तिसऱ्यांदा घटस्फोट घेणार आहेत या चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी राहूल महाजन याने डिंपी सोबत लग्न केले होते. आता तिसऱ्या घटस्फोटाच्या बातम्या जरी समोर आलेल्या असल्या तरीही आतापर्यंत त्या दोघांपैकी एकाहीने आपल्या आयुष्याबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. त्यामुळे त्यांच्यात घटस्फोट होणार आहे की झाला आहे याबद्दल अजुन खरी माहिती समोर येऊ शकलेली नाही.(Rahul Mahajan Divorce)
या जोडप्याच्या जवळच्या सूत्राने ईटाइम्सला सांगितले की, “दोघांमध्ये सुरुवातीपासून बरेच वाद होते. मात्र, त्यांनी शक्य तितके आपले लग्न टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या वर्षी ते विभक्त झाले आणि घटस्फोटासाठी त्यांनी अर्ज केला. या जोडप्याने गेल्या वर्षी कागदपत्रे दाखल केली होती, ते पुढे अस ही म्हणाले की, ‘ब्रेकअपनंतर राहुल पूर्णपणे तुटला होता, आता तो ठीक आहे. ते दोघे ही पुन्हा सर्व चांगले करण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या वर्षी त्यांची प्रकृती फारशी चांगली नव्हती. आता त्याला प्रेम मिळेल अशी आशा आहे. तसेच मागील अनुभवांमुळे त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल न बोलण्याचा निर्णय घेतला आहे.” आता त्यांच्यात घटस्फोट झाला आहे की अद्याप प्रक्रिया सुरू आहे हे स्पष्ट झालेले नाही. नताल्या ही राहुल महाजनची तिसरी पत्नी होती. यापूर्वी त्याने श्वेता सिंहसोबत लग्न केले होते आणि नंतर ‘राहुल दुल्हनिया ले जाएंगे’ या रिअॅलिटी शोमध्ये त्याची भेट डिंपी गांगुलीसोबत झाली होती. डिंपी आणि राहुल यांनी 2010 मध्ये लग्न केले आणि 2015 मध्ये ते वेगळे ही झाले होते.
मात्र, राहुल महाजन यांनी या वृत्ताचे खंडन केले नाही किंवा त्याला दुजोरा ही दिलेला नाही. ‘मला माझं वैयक्तिक आयुष्य खासगी ठेवायचं आहे. मी कशावरही भाष्य करू इच्छित नाही. माझ्या वैयक्तिक आयुष्यात काय चालले आहे याबद्दल मी माझ्या मित्रांशी देखील बोलत नाही.” अस राहुल म्हणाला तर नताल्या इलीना ही याबद्दल काहीच बोलली नाही. राहुल ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोच्या एका सीझनमध्ये दिसला होता आणि नताल्यासोबत ‘स्मार्ट जोडी’ मध्ये दिसला होता.(Rahul Mahajan Divorce)
=======================
=======================
दरम्यान नताल्या इलीना ही राहुलची तिसरी पत्नी आहे. त्या दोघांचा विवाह २०१८ मध्ये झाला होता. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाली. आता त्या दोघांच्या बाबतीत पसरलेल्या या बातम्यांवर तय दोघांमधील कोणीतरी एक समोर येऊन खरी माहिती देईल अशी आशा आहे.