हॉलीवूडची कॉपी केल्यामुळे ‘या’ हिंदी सिनेमाच्या सर्व प्रिंट्स कोर्टाने संपूर्णपणे

Lalbagcha Raja : ९१ वर्षांत पहिल्यांदाच राजासमोर लाईव्ह गाण्याची संधी मिळाली ‘या’ मराठी गायकाला!
‘तुच सुखकर्ता तुच दुख हर्ता…’ दिवसरात्र बाप्पाची गाणी आपल्याला ऐकू येत आहेत… घरगुती गणपती प्रमाणेच सार्वजनिक मंडळांमध्येही उत्साहातं वातावरण दिसतंय… अशातच लालबागच्या राजाची शान काही औरच आहे… यंदा भव्य देखावा देखील उभारला असून राजाच्या समोर पहिल्यांदाच ९१ वर्षांच्या इतिहासात एका मराठमोळ्या कलाकाराला लालबागच्या राजाच्या चरणी लाईव्ह गाणं गाण्याची संधी मिळाली आहे…

दरम्यान, गेले अनेक वर्ष लालबागच्या राजा पंडालमध्ये सतत स्पीकरवर गाणी सुरु असतात. यंदा पहिल्यांदाच लाईव्ह परफॉर्मन्स सादर केले जाणार असून हा मान यंदा मराठमोळा गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) याला मिळाला आहे. ९१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा गायक लालबागच्या राजाच्या दरबारात लाइव्ह सादरीकरण केलं आहे.
================================
हे देखील वाचा : Ganpati Festival 2025 : मराठी कलाकारांच्या घरचा बाप्पा!
=================================
राहुल वैद्य बद्दल बोलायचं झालं तर, नुकताच तो लाफ्टर शेफ मध्ये दिसला होता… तसेच, राहुल इंडियन आयडलच्या पहिल्या सीझनचा फायनलिस्ट ठरला होता. याशिवाय, त्याने बिग बॉसमध्येही भाग घेतला होता. त्यामुळे एककीडे वेगवेगळ्या रिएलिटी शो मधून प्रसिद्धी मिळवणाऱ्या राहूलसाठी लालबागच्या राजाच्या चरणी लाईव्ह गाणं नक्कीच त्याच्यासाठी विशेष संधी ठरणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi