Gulkand : हिंदी चित्रपटांना ‘गुलकंद’ आणि ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटाची

Raid 2 : अमय पटनायकची जादू बॉक्स ऑफिसवर चालली का?
अजय देवगण (Ajay Devgan) आणि रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) यांची प्रमुख भूमिका असणारा ‘रेड २’ (Raid 2) चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेड मारण्यास यशस्वी झाला आहे. २०१८ मध्ये आलेल्या रेड चित्रपटाचा हा सीक्वेल असून प्रेक्षकांनी पहिल्या भागाइतकाच दुसऱ्या भागालाही उत्तम प्रतिसाद देत आहेत. जाणून घेऊयात ‘रेड २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे. (Entertainment news)

अमय पटनायकचा ‘रेड’ चित्रपट या वर्षातील पहिल्या दिवशी तुफान कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे. सॅकनिल्कने दिलेल्या माहितीनुसार ‘रेड २’ चित्रपटाने पहिल्या दिवशी १९.२५ कोटी, दुसऱ्या दिवशी १२ कोटी, तिसऱ्या दिवशी १.८२ कोटी कमवत आत्तापर्यंत या चित्रपटाने एकूण ३३.०७ कोटींची कमाई केली आहे. (Raid 2 box office collection)
राज कुमार गुप्ता दिग्दर्शित ‘रेड २’ चित्रपटातील IRS ऑफिसर अमय पटनायक ही भूमिका साकारणाऱ्या अजय देवगणने प्रेक्षकांची मनं पुन्हा एकदा जिंकली आहेत. महत्वाचं म्हणजे रिलीजच्या पहिल्या दिवशीच हा चित्रपट २०२५ चा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. (Bollywood tadaka)

बॉलीवूड हंगामाच्या आकडेवारीनुसार, ‘रेड २’ ने ‘ग्राउंड झिरो’ (५ कोटी), ‘इमर्जेन्सी’ (१६.५२ कोटी), ‘आझाद’ (६.३२ कोटी), ‘गेम चेंजर’ (२६.६० कोटी) या चित्रपटांना मागे टाकले आहे. तसेच, चित्रपटात रितेश देशमुख याने साकारलेली दादाभाईची भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडली असून सौरभ शुक्ला यांनी पुन्हा एकदा आपली जादू दाखवली आहे. (Bollywood movies box office collection)
===============================
हे देखील वाचा: Raid 2 : अजय देवगण की रितेश देशमुख? रेड २ साठी सर्वाधिक मानधन कोणाला?
===============================
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार ‘रेड २’ चित्रपटाचं एकूण बजेट ४८ कोटी होतं. बॉक्स ऑफिसवर आत्तापर्यंत ‘रेड २’ चित्रपटाने केलेल्या कमाईतून बजेटचे ८० टक्के रिक्व्हर केले आहेत. या चित्रपटात रितेश देशमुखला ४ कोटी तर अजय देवगणला २० कोटींचं मानधन देण्यात आलं होतं. ‘रेड २’ मध्ये अजय देवगण, रितेश देशमुख, वाणी कपूर, सौरभ शुक्ला, रजत कपूर, अमित सियाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Raid 2 cast)