
Raid 2 : बॉक्स ऑफिसवर ‘रेड २’ चित्रपटाने मारली बाजी!
१ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनी प्रदर्शित झालेल्या ‘रेड २’ (Raid 2) चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. २०१८ मध्ये आलेल्या रेड चित्रपटाचा हा सीक्वेल असून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. IRS ऑफिसर अमय पटनायक यांची ही ७५ वी रेड असून प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी करेक्ट धाड घातली आहे. जाणून घेऊयात अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्या रेड २ ने किती कमाई केली आहे.(Bollywood news)

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार ‘रेड २’ चित्रपटाने पहिल्या दिवशी १९.२५ कोटी, दुसऱ्या १२ कोटी, तिसऱ्या १८ कोटी, चौथ्या दिवशी २२ कोटी, पाचव्या दिवशी ७.५ कोटी, सहाव्या दिवशी ७ कोटी, सातव्या दिवशी ४.७५ कोटी, आठव्या दिवशी ५.२५ कोटी कमवत पहिल्या आठवड्याच्या शेवटी चित्रपटाने ९५.७५ कोटी कमावले. नवव्या दिवशी ५ कोटी, दहाव्या दिवशी ८.२५ कोटी, अकराव्या दिवशी ११.७५ कोटी, बाराव्या दिवशी ४.८५ कोटी, तेराव्या दिवशी ४.५ कोटी, चौदाव्या दिवशी ३.२५ कोटी, पंधराव्या दिवशी ३.७ कोटी कमवत दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी ४०.६७ कोटी कमावले. तर, सोळाव्या दिवशी ६७ लाख कमवत आत्तापर्यंत चित्रपटाने एकूण १३७.०९ कोटींची कमाई केली आहे.(Raid 2 box office collection)
==================
हे देखील वाचा : Ajay Devgan : ‘अजय ते विजय साळगांवकर’;बॉलिवूडमध्ये 9 मराठी पात्र साकारणारा देवगण!
==================
मिळालेल्या माहितीनुसार ‘रेड २’ चित्रपटाचं बजेट ४८ कोटी होतं. बॉक्स ऑफिसवरील कमाईतून चित्रपटाने बजेट रिकव्हर केलं आहे. तर २०२१८ मध्ये आलेल्या रेड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०३.०७ कोटींची कमाई केली होती. ‘रेड २’ (Raid 2) चं दिग्दर्शन राजकुमार गुप्ता यांनी केले असून, भुषण कुमार, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि कृष्ण कुमार यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटात अजय देवगण, रितेश देशमुख, वाणी कपूर, सौरभ शुक्ला, रजत कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Raid 2 movie cast)